Firebrand Trailer: Netflix वर 22 फेब्रुवारीला रीलिज होणार Priyanka Chopra निर्मित पहिला मराठी सिनेमा, पहा दमदार ट्रेलरची खास झलक
Firebrand Trailer (Photo Credits: You Tube)

Firebrand Trailer: Ventilator नंतर आता प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) निर्मित नवा मराठी चित्रपट 'फायरब्रॅन्ड' (Firebrand) रसिकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे. टेलिव्हिजन, रूपेरी पडद्यानंतर भारतामध्ये झपाट्याने वाढत असलेल्या डिजिटल माध्यामामध्ये आता प्रादेशिक भाषांचाही डंका सुरू झाला आहे. Netflix या जगभर लोकप्रिय असलेल्या डिजिटल माध्यमाचा पहिला वहिला मराठी सिनेमा (Netflix’s first licensed original film in Marathi)  22 फेब्रुवारीला रसिकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे. नुकताच त्याचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे.

'फायरब्रॅन्ड'ट्रेलर 

महिलांच्या सबलीकरणावर भाष्य करणारा 'फायरब्रॅन्ड' या सिनेमामध्ये उषा जाधव, गिरीश कुलकर्णी, सचिन खेडेकर, राजेश्वरी सचदेव ही कलाकार मंडळी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. आजच्या आधुनिक काळात 'नातं'आणी त्याच्याबद्दलच्या संकल्पना कशा बदलत आहेत? यावर भाष्य करण्यात आलं आहे. उषा जाधव वकिलाच्या भूमिकेत आहे. स्वतःच्या वैवाहीक आयुष्यात वैयक्तिक लढा देता देता देता इतर महिलांसाठी लढणारी कणखर स्त्री अशा दमदार भूमिकेची झलक ट्रेलरमधून येते.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते अरुणा राजे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. नेटफ्लिक्सच्या माध्यमातून हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार असल्याने एकाचवेळी जगभरातले अनेक मराठी सिनेमे चाहते या कलाकृतीचा आनंद घेऊ शकणार आहेत.