प्रियंका चोप्रा लाईव्ह चॅट करताना पती निक याने केली 'ही' चूक, पीसी झाली नाराज (Video)
Nick Jonas And Priyanka Chopra (Photo Credits-Instagram)

अभिनेत्री आणि इंटरनॅशनल स्टार प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आणि पती निक जोनस (Nick Jonas)  सध्या लॉकडाउनच्या काळात घरातच राहत असून मजा करताना दिसून येत आहेत. प्रियंका आणि निक यांची जोडी आणि त्यांच्यामधील प्रेम प्रत्येक दिवशी सोशल मीडियात झळकत असते. मात्र आता प्रियंका हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत असून त्यामध्ये ती निकच्या एका चुकीमुळे ती रागवली असल्याचे दिसून आले आहे. या व्हिडिओवर आता चाहत्यांकडून विविध प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

प्रियंका हिचा एकूणच फॅशनबद्दलचा सेंस पाहता प्रत्येकजण तिला फॉलो करण्याचा प्रयत्न करतात. तसेच निक सोबतच्या लहानसहान गोष्टी प्रियंका सोशल मीडियात पोस्ट करत असते. मात्र आता एका व्हिडिओत प्रियंका लाईव्ह चॅट करत असताना निक याने एक चुकी केल्याने नाराज झाल्याचे दिसून आले आहे. प्रियंका लाईव्ह चॅटमध्ये कोरोना संदर्भात जागृकता निर्माण करण्यासाठी सांगत होती. त्यावेळी निक आणि त्यांचा कुत्रा घरातून फिरत असताना एक भांड पडल्याचा आवाज येतो. त्यावेळी प्रियंका हिने दिलेले रिअॅक्शन पाहण्यासारखी असून ती काही सेकंदासाठी गप्प झाल्याचे दिसून येत आहे. प्रियंकाची ही रिअॅक्शन पाहिल्यानंतर तिच्या चाहत्यांनी निकवर पीसी नाराज झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे. लग्नानंतर पहिल्यांदाच प्रियंका निकवर नाराज झाल्याचे दिसून आले आहे.(Coronavirus Lockdown मध्ये सलमान खान घोड्यांसोबत एन्जॉय करतोय ब्रेकफास्ट; पहा त्याचा अजब अंदाज Watch Video)

दरम्यान, प्रियंका हिने काही दिवसांपूर्वी लॉस एंजलिस येथील मुलांची मदत करण्याचे आवाहन केले होते. तिने असे म्हटले होते की, अभ्यासासाठी मुलांना हेडफोन्स देण्याचे सांगितले होते. प्रियंका चोप्रा सध्या पती निक जोनस आणि कुत्रा जीनो व डायना यांच्यासोबत लॉस एंजलेस येथे राहत आहेत.