Pornographic Films Case: Raj Kundra ची Bombay High Court मध्ये धाव; अटक बेकायदेशीर असल्याचं सांगत याचिका
Raj Kundra | PC: Twitter/ANI

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती आणि उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra) याच्या कोठडीमध्ये आज (23 जुलै) येत्या 27 जुलै पर्यंत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान राज कुंद्रा त्याच्या अटकेविरूद्ध आता बॉम्बे हाय कोर्टाची (Bombay High Court) दारं ठोठावणार असल्याची माहिती समोर आली आहे. ANI ट्वीट च्या माहितीनुसार, राज कुंद्रा मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. त्याच्या मते त्याची अटक ही बेकायदेशीर आहे. राज कुंद्राला 19 जुलै दिवशी अटक करण्यात आली आहे. काही पॉर्न फिल्म बनवण्याचे आरोप त्यांच्यावर आहेत. राज कुंद्रा याच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी हिची पहिली पोस्ट, पहा काय लिहिले.

दरम्यान आज शिल्पा आणि राज कुंद्रा याच्या घरी मुंबई पोलिस क्राईम ब्रांच पथक पोहचले आहे. त्यांनी पॉर्न फिल्म मेकिंग प्रकरणी काही तपासणी केली आहे. राज कुंद्रा याच्यावर भारतामध्ये पॉर्न फिल्म शूट करून त्या युके मध्ये एका अ‍ॅपवर प्रसारित करून त्यामधून पैसे कमावल्याचा आरोप आहे. या प्रकरणी अद्याप शिल्पा शेट्टीला समंस जारी करण्यात आलेला नाही.

ANI Tweet

मुंबई पोलिसांनी काही दिवसांपुर्वी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी सबळ पुराव्याच्या आधारे राज कुंद्रा यांना अटक केली आहे. काही महिला मॉडेल्सनी केलेल्या तक्रारीवर ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये काही व्हॉट्सअ‍ॅप चॅटदेखील मुंबई पोलिसांच्या हाती लागले आहेत. तर ज्या अ‍ॅप वर पॉर्न फिल्म प्रसारित होत होत्या ते हॉट शॉट अ‍ॅप अ‍ॅपल, गूगल प्ले स्टोअर कडून डाऊन करण्यात आल्याने आता ते ऑनलाईन दिसत नाही. असे देखील पोलिसांनी सांगितले आहे.