PM Narendra Modi Biopic Trailer: पंतप्रधान नरेंद्र मोदी बायोपिक ट्रेलरमध्ये RSS पासून ते पंतप्रधान होण्यापर्यंतच्या प्रवासाची झलक
PM Narendra Modi Biopic | (Photo Credits: Youtube)

सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिकचे (Biopic) वारे वाहत आहेत. विविध नेत्यांचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर उलघडला जात आहे. त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या बायोपिकचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. मोदींच्या राजकीय प्रवासापासून ट्रेलरची सुरुवात होते. त्यानंतर त्यांचा पंतप्रधान बनण्यापर्यंतचा प्रवासाचे दर्शन ट्रेलरमध्ये होते. या सिनेमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिका विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) याने साकारली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकपूर्वीच वेब सिरीजमधून उलगडणार जीवनप्रवास

सिनेमाचा ट्रेलर विवेकने ट्विटरवर शेअर करत लिहिले की, "तुम्हाला सर्वांना त्या प्रवासाची एक झलक दाखवताना प्रचंड अभिमान वाटत आहे. हा प्रवास तुम्ही यापूर्वी पाहिलेला नाही. एका असामान्य व्यक्तीचा असामान्य जीवनप्रवास दाखवण्याचा आमचा हा एक नम्र प्रयत्न आहे."

विवेक ओबेरॉय याचे ट्विट:

सिनेमाच्या ट्रेलर मोदींच्या राजकीय प्रवासासोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरही एक प्रकाश टाकण्यात आला आहे. इतकंच नाही तर ट्रेलर मोदींची आधात्मिक बाजूही उलघडली गेली आहे. मोदींच्या बायोपिकच्या या ट्रेलरमध्ये इंदिरा गांधींची झलकही पाहायला मिळते. PM Narendra Modi या बायोपिकमधून 'ही' अभिनेत्री साकारणार 'जसोदाबेन' यांची भूमिका

पहा सिनेमाचा ट्रेलर:

मुंबई, गुजरात, आणि उत्तराखंड सह इतर अनेक भागात या सिनेमाचे शूटिंग पार पडले आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन ओमंग कुमार यांनी केले असून निर्मितीची सुत्रं सुरेश ओबेरॉय, संदीप सिंग आणि आनंद पंडित यांनी एकत्रितपणे सांभाळली आहेत. हा सिनेमा लोकसभा निवडणूकीपूर्वी म्हणजे 5 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.