पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकपूर्वीच वेब सिरीजमधून उलगडणार जीवनप्रवास
Eros Now announces web series titled 'Modi' (Photo Credit: Twitter)

सध्या सिनेसृष्टीत बायोपिकचे वारे वाहत आहेत. अलिकडेच बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील 'ठाकरे,' (Thackeray) माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांचा जीवनपट 'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' (The Accidental Prime Minister) हे सिनेमे प्रदर्शित झाले. तर नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारीत 'पीएम नरेंद्र मोदी' (PM Narendra Modi) हा सिनेमाही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण तत्पूर्वी मोदींच्या आयुष्यावर वेब सिरीज येऊ घातली आहे. इरॉस नॉऊने ट्विट करत याची माहिती दिली. PM Narendra Modi या बायोपिकमधून 'ही' अभिनेत्री साकारणार 'जसोदाबेन' यांची भुमिका

या वेब सिरीजमध्ये नरेंद्र मोदी यांचा जीवनप्रवास दाखवण्यात येणार आहे. मोदींच्या बालपणापासून ते पंतप्रधान होण्यापर्यंतचा प्रवास दहा भागांच्या वेब सिरीजमध्ये दाखवण्यात येणार आहे. उमेश शुल्का दिग्दर्शित या वेब सिरीजचे शूटिंग गुजरात, उत्तराखंड, दिल्ली या ठिकाणी करण्यात आलं आहे.

या वेब सिरीजमध्ये महेश ठाकूर पंतप्रधान मोदींची भूमिका साकारत असून एप्रिल महिन्यापासून ही वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.