आता Hrithik Roshan चा Vikram Vedha विरोधात Boycott ट्रेंड; 'Laal Singh Chaddha' ठरले कारण
Hrithik Roshan And Amir Khan (Photo Credit - Twitter)

बॉलिवूड चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याचा ट्रेंड सध्या जोरात सुरू आहे. दररोज एक ना एक चित्रपट आणि कलाकार यांच्या विरोधात बहिष्काराचा ट्रेंड चालवला जातो. अशा परिस्थितीत या बहिष्कार टाकण्याचा ट्रेंडमूळे बॉलिवूड (Bollywood) नुकसान होत आहे का, अशीही चर्चा सुरू झाली आहे. कोणत्याही चित्रपटाशी जवळपास 200 ते 300 लोक जोडलेले असतात. अशा परिस्थितीत चित्रपटाच्या खराब प्रदर्शनाचा परिणाम सर्वांवर होतो. 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) आणि त्यांच्या आगामी चित्रपटांना पाठिंबा देणाऱ्या कलाकारांवर बहिष्काराचा ट्रेंड सुरू आहे. आता असेच काहीसे हृतिक रोशन (Hrithik Roshan) स्टारर 'विक्रम वेधा' (Vikram Vedha) या चित्रपटासोबत घडत आहे. कारण, शनिवारी 'लाल सिंह चड्ढा' पाहण्यासाठी हृतिक रोशन थिएटरमध्ये गेला होता. त्याने आमिरच्या चित्रपटाच्या समर्थनार्थ ट्विट करत सर्वांना चित्रपट पाहण्याची विनंती केली आहे. हृतिकच्या या ट्विटने आता त्याच्यावर छाया पडल्याचे दिसत आहे.

Tweet

यूजर्स करत आहे ट्रोल

हृतिकच्या ट्विटनंतर ट्विटरवर #BoycottVikramVedha हा ट्रेंड सुरू झाला. एका यूजर्सने म्हटले की, 'प्रत्येक कृतीसाठी एक प्रतिक्रिया असते.' दुसरा ट्रोल म्हणाला, '29 सप्टेंबर येऊ द्या मग आम्ही तुम्हाला विक्रम वेधावर बहिष्कार टाकून दाखवतो. हिंदुद्वेष्ट्या सैफ अली खानने छत्रपती शिवाजी महाराज आणि तानाजी हे काल्पनिक असल्याचे सांगितले होते ते लक्षात ठेवा. एकाने लिहिले, 'आर्थिक बहिष्कार ही सुशांत सिंह राजपूतसाठी बॉलिवूडने केलेली सर्वोत्तम शिक्षा आहे.' (हे देखील वाचा: आमिर खानच्या चित्रपटाची कमाई सलग तिसऱ्या दिवशी घटली, आतापर्यंत जमवला 'इतका' गल्ला)

विक्रम वेधा या दिवशी होवू शकतो रिलीज? 

विक्रम वेध या चित्रपटाच्या शूटिंगचे काम पूर्ण झाले आहे. या महिन्याच्या अखेरीस चित्रपटाचा टीझरही प्रदर्शित होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याच वेळी, 'विक्रम वेधा' 30 सप्टेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये दाखल होऊ शकतो.