Ayesha takiya Photo Credit FB

Ayesha Takia: बॉलिवूडमधील वॉनडेट चित्रपटातील अभिनेत्री आयशा टाकीया सद्या चर्चेत आहे. ही काही वर्षांपासून चित्रपट सृष्टीतून दुर असली तरी देखील सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. नुकतचं तीने सोशल मीडियावर फोटो शेअर केला होता. हा फोटो पाहून नेटकरी हैराण झाले आहे. नेटकऱ्यांनी तीचा फोटो पाहून तीला ट्रोल केले आहे. (हेही वाचा- राजकुमार हिरानीची OTT वर एंट्री, विक्रांत मॅसी आणि अर्शद वारसीसोबत सायबर क्राईम थ्रिलर 'प्रीतम पेड्रो'ची घोषणा)

मिळालेल्या माहितीनुसार, आयशा टाकिया नेटकऱ्यांकडून ट्रोल झाल्यामुळे तीन इन्स्टाग्राम डिलीट केल्याची माहिती समोर आली आहे. फोटोमंध्ये तीन प्लास्टित सर्जरी केल्याचे दिसत आहे. सर्जरी केल्यानंतर तीने फोटो पोस्ट केला. या फोटोत तीचा वेगळाच लूक पाहायला मिळत आहे. लूकमुळे आयशा चांगलीच चर्चेत आली. नेटकऱ्यांनी तीला ट्रोल केले.

शुक्रवारी सकाळी नेटकऱ्यांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आयशाचे इंस्टाग्रामचे प्रोफाईल सापडले नाही. त्यामुळे तीच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. नेटकऱ्यांनी तीला चांगलेच ट्रोल केले त्यामुळे तीने प्रोफाईल हटवले असणार असा दावा करण्यात आला आहे. प्रोफाईल हटवण्यापूर्वी अभिनेत्रीने कोणतीही विधान जाहिर केले नाही. तीनं नुकतच प्लास्किट सर्जरी, लिप सर्जरी आणि इतर कॉस्मेटिक प्रक्रिया केली. ज्यामुळे तिचा ट्रास्फोर्मेशन झाले आहे.

आयेशा टाकीया व्हिडिओ 

नेटकऱ्यांनी फोटोवर अनेक कंमेट केले. एकाने लिहले की, तीनं स्वत: हून चेहरा बिघडवला आहे. तर दुसऱ्याने लिहले की, त्यांचे सौर्दय आता संपले आहे. आयशा टाकिया हीनं टारझर द वन्डर कार या चित्रपटातून पदार्पण केले. तीने, नो स्मोकिंग, पाठशाला, सलामे इश्क या चित्रपटात कामे केली.