Neha Dhupia Pregnancy: नेहा धुपिया दुसऱ्यांदा होणार आई, बेबी बंप फ्लॉन्ट करत दिली गोड बातमी
Neha Dhupia and Angad Bedi (Photo Credits-Instagram)

Neha Dhupia Pregnancy: अभिनेत्री नेहा धुपिया दुसऱ्यांदा आई होणार आहे. बेबी बंप फ्लॉन्ट करत नेहा धुपिया हिने दुसऱ्या वेळेस प्रेग्नेंट असल्याचे सांगितले आहे. नेहा हिने इंस्टाग्रामवर आपला नवरा अंगद बेदी आणि मुलगी मेहर हिच्यासोहत एक फोटो शेअर केला आहे. त्याचवेळी तिने पुन्हा एकदा आई होणार असल्याची गोड बातमी दिली आहे. तिने असे म्हटले की, ही गोड बातमी सांगण्यासाटी आम्हाला दोन दिवस लागले.(The Kapil Sharma Show पु्न्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला; जुन्या कलाकारांसोबत करणार नवी सुरुवात)

नेहा हिने फोटो शेअर करत असे लिहिले आहे की, कॅप्शन शोधण्यास आम्हाला दोन दिवस लागले आणि ज्या शानदार गोष्टीबद्दल आम्ही विचार करत होतो ती ही आहे. थँक्यू देवा. नेहाच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीमुळे सेलेब्स आणि चाहत्यांमध्ये उत्साह अधिक वाढला गेला आहे. सानिया मिर्जा, भावना पांडे, फराह खान, रोहित रेड्डीसह काही सेलेब्सकडून नेहा आणि अंगद बेदी यांना दुसऱ्या बाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.(Rahul Vaidya-Disha Parmar Wedding: गायक राहुल वैद्य आज अडणार विवाहबंधनात; पहा त्याच्या हळदी समारंभातील काही क्षण)

 

View this post on Instagram

 

A post shared by Neha Dhupia (@nehadhupia)

तर नेहा धुपिया हिच्या पहिला प्रेग्नेंसी बद्दल जोरदार चर्चा रंगल्या होत्या. मे 2018 मध्ये अंगद आणि नेहा हिने त्यांनी गुपचुप लग्न केल्याच्या बातमीने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यानंतर काही दिवसांनी तिने ती आई होणार असल्याचे जाहीर केले होते. तेव्हा सुद्धा नेहा हिच्या प्रेग्नेंसीवरुन प्रश्न उपस्थितीत करण्यात आले होते. पण लग्नाच्या सहा महिन्यानंतर नोव्हेंबर 2018 मध्ये तिने आपली पहिली मुलगी मेहर हिचे आपल्या घरात स्वागत केले.