The Kapil Sharma Show पु्न्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला; जुन्या कलाकारांसोबत करणार नवी सुरुवात
The Kapil Sharma Show (Photo Credits: Instagram)

'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show) च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कपिल शर्मा शो पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. खुद्द कपिल शर्मा (Kapil Sharma) याने सोशल मीडियाद्वारे याची घोषणा केली आहे. सोशल मीडिया पोस्टमध्ये कपिलने स्टारकास्ट सोबत फोटोज शेअर केले आहेत. त्यात कपिलसोबत भारती सिंह, कीकू शारदा, कृष्णा अभिषेक, चंदन प्रभाकर आणि सुदेश लहरी हे कलाकार दिसून येत आहेत. तसंच या पोस्टला कॅप्शन देताना कपिलने लिहिलं की, "जुन्या चेहऱ्यांसोबत नवी सुरुवात."

मात्र अद्याप शो चे डिटेल्स हाती आलेले नाहीत. मात्र कपिल शर्मा शो चा आनंद पुन्हा एकदा लुटता येणार आहे. त्यामुळे चाहते खुश झाले असतील, हे नक्की. दुसऱ्यांदा पिता झाल्यानंतर कपिलने लॉकडाऊन काळात शो बंद केला होता. आता मात्र पुन्हा एकदा शो भेटीला येत असल्याने प्रेक्षक आतुर झाले आहेत. प्रेक्षकांचा उत्साह कमेंट्समध्ये पाहायला मिळत आहे.

पहा पोस्ट:

 

View this post on Instagram

 

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

काही दिवसांपूर्वी कॉमेडियन कृष्णा अभिषेकच्या इंस्टाग्राम स्टोरीवरुन द कपिल शर्मा शो परतत असल्याचा अंदाज आला होता. कृष्णा अभिषेकने भारती सिंह आणि कीकू शरदा यांच्यासोबत फोटो शेअर केला होता. तसंच त्या फोटोला दिलेल्या कॅप्शनवरुन शो ची हिंट मिळत होती. (The Kapil Sharma Show: जाणून घ्या नक्की का बंद होणार 'द कपिल शर्मा शो')

दरम्यान, पुन्हा पिता झाल्यावर कुटुंबियांना वेळ देण्याासाठी आणि त्याचबरोबर कोरोना लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत हा शो काही कालावधीसाठी ऑफ एअर करण्यात आला होता.