The Kapil Sharma Show: जाणून घ्या नक्की का बंद होणार 'द कपिल शर्मा शो'
Kapil Sharma (Photo Credits: Instagram)

गेल्या काही दिवसांपासून बातम्या येत होत्या की, कपिल शर्माचा (Kapil Sharma) कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show) लवकरच बंद होणार आहे. एका नवीन अवतारात तो पुन्हा लाँच होणार असल्याने आत्ता तो ऑफ एयर जाणार असल्याची चर्चा होती. पुढच्या महिन्यात फेब्रुवारीच्या मध्यभागी हा शो बंद होणार असल्याची पुष्टी झाली आहे. परंतु निर्माते हा शो पुन्हा नव्या अवतारात घेऊन येणार नाहीत, तर प्रॉडक्शन हाऊसने अनेक कारणे लक्षात घेऊन हा कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 'द कपिल शर्मा शो' काही महिन्यांनंतर पुन्हा टीव्हीवर परत येऊ शकेल.

सहसा कपिल शर्माच्या शोमध्ये अशा सेलिब्रिटीज दिसतात, ज्यांना आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करायचे आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सध्या कोणताही मोठा चित्रपट प्रदर्शित होत नाही, यामुळे शोच्या निर्मात्यांना गेस्ट मिळणे अवघड ठरत आहे. कपिल शर्मा शो प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाला आहे. कार्यक्रमात लाईव्ह प्रेक्षकांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे, परंतु साथीच्या रोगामुळे लाइव्ह प्रेक्षक शोमध्ये येऊ शकले नाहीत जे, 'द कपिल शर्मा शो' बंद होण्याचे अजून एक कारण आहे.

यासोबतच टीव्ही इंडस्ट्रीत बातमी आहे की, कपिलची पत्नी गिन्नी चतरथ दुसऱ्यांदा गर्भवती आहे. यापूर्वी गिन्नी डिसेंबर 2019 मध्ये आई झाली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, कपिलला गिन्नीची काळजी घेण्यासाठी घरीच रहायचे आहे, जेणेकरून तिला कोणतीही अडचण होऊ नये. दोन-तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर, तो पुन्हा नव्या मनोरंजक कंटेंटसह छोट्या पडद्यावर परत येऊ शकतो. मात्र, कपिलने गिन्नीच्या गरोदरपणाविषयी कोणतेही विधान केलेले नाही. तर अशा काही कारणांमुळे सध्या हा शो बंद होणार आहे. (हेही वाचा: Bigg Boss 14 ची टॅलेंट मॅनेजर Pista Dhakad चा अपघातामध्ये मृत्यू; सलमान खानने सोशल मिडियाच्या माध्यमातून वाहिली श्रद्धांजली)

दरम्यान, 'द कपिल शर्मा शो' डिसेंबर 2018 मध्ये ऑन-एयर झाला होता. कपिल व्यतिरिक्त, या शोमध्ये भारती सिंग, कृष्णा अभिषेक, चंदन प्रभाकर, किकू शारदा, सुमोना चक्रवर्ती आणि अर्चना पूरन सिंह यांच्या प्रमुख भूमिका आहेत.