Rahul Vaidya-Disha Parmar Wedding: गायक राहुल वैद्य आज अडणार विवाहबंधनात; पहा त्याच्या हळदी समारंभातील काही क्षण
राहुल वैद्य हळद । PC: Instagram

गायक आणि बिग बॉस घरातून पुन्हा रसिकांच्या गळ्यातला ताईत झालेला राहुल वैद्य (Rahul Vaidya) आज (16 जुलै) विवाहबंधनात अडकणार आहे. राहुल त्याची गर्लफ्रेंड दिशा परमार (Disha Parmar) याच्यासोबत आज लगीन गाठ बांधणार असल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. राहुल आणि दिशाची जोडी 'Dishul' म्हणून सोशल मीडीयात प्रसिद्ध आहे. आज त्यांच्या लग्नाच्या पार्श्वभूमीवर #DishulWedding वर अनेक फोटोज, व्हिडीओज पहायला मिळत आहेत. दरम्यान मागील दोन दिवसांपासून राहुल आणि दिशाच्या लग्नापूर्वीच्या समारंभांना सुरूवात झाली आहे. दिशाच्या मेहंदी सोहळ्यानंतर काल हळदी मध्येही त्यांनी धमाल केल्याचं पहायला मिळालं आहे. Rahul Vaidya ने Disha Parmar सोबत शेअर केला रोमँटिक व्हिडिओ; सिंगरने सुंदर अंदाजात घेतले चुंबन.

राहुल वैद्यची बहीण श्रुती वैद्य हीने सोशल मीडियात हळदी कार्यक्रमातील एक फोटो टाकत माझी हळद त्याला 'ग्लो' करेल असे म्हणत पिवळ्या साडीतला फोटो शेअर केला आहे. राहुल वैद्य आणि दिशा परमारच्या हळदी सोहळ्याला त्यांच्या कुटुंबियांसोबत काही मित्र-मैत्रिणींनी सहभाग घेतला होता. त्यांनी देखील दोघांना हळद लावून धमाल मस्ती केल्याचं पहायला मिळालं आहे. Who is Disha Parmar? Bigg Boss 14 चा स्पर्धक राहुल वैद्य ने लग्नाची मागणी घातलेली मुलगी दिशा परमार नेमकी आहे तरी कोण, वाचा सविस्तर.

राहुल वैद्यची हळद

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Fanpage (@jaslylove51)

राहुल वैद्य काही दिवसांपूर्वीच खतरों के खिलाडी मध्ये सहभागी झाला होता. बिग बॉस 14 चा तो रनर अप होता. बिग बॉस मध्ये असताना त्याने दिशा वरील आपलं प्रेम नॅशनल टीव्ही वर सर्वांसमोर जाहीर केले होते. त्यानंतर दिशाने देखील त्याला प्रतिसाद दिला आणि अखेर आता ते दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत. दरम्यान कोविड 19 नियमावलीनुसार मोजक्या लोकांच्या उपस्थिती मध्येच हे दोघं आज साताजन्माच्या गाठी बांधणार आहेत.