मुंबईत मैत्रीणीच्या लग्नात दीपिका पादुकोण हिने घातलेली साडी चक्क 1.25 लाख रुपयांची!
Deepika Padukone (Photo Credits-Instagram)

दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आपल्या फॅशनसेंसमुळे काहीजण तिच्याकडून प्रेरणा घेतात. तर नुकत्याच मुंबईत एका लग्नात दीपिका पादुकोण ही पती रणवीर सिंग सोबत दिसून आली. त्यावेळी अत्यंत सुंदर दिसत होती. मात्र दीपिकाने लग्नात घातलेल्या साडीची किंमत चक्क 1.25 लाख रुपये आहे.

गेल्या रविवारी दीपिका हिने आपल्या मैत्रिणीच्या लग्नात उपस्थिती लावली होती. त्यावेळी फॅशन डिझायनर रोहित बाल ह्याच्या ब्रँन्डच्या साडीत दिसली होती. त्याची किंमत लाखोंच्या घरात आहे. साडी ही सफेद रंगाची असून त्यावर रेड रोज प्रिंट, गोल्ड डिटेल आणि ग्रीन स्टेम्स आहेत.

(मुंबई: पत्नी दीपिका पादुकोण हिची चप्पल हातात घेऊन लग्नात चक्क रणवीर सिंग फिरताना दिसला Photo)

तसेच दीपिकाचा सफेद रंगामधील साडीतील लूक खुलून दिसत होता. तर लग्नात दीपिका हिची चप्पल हातात घेऊन फिरताना रणवीर सुद्धा दिसला होता. त्यावेळी नेटकऱ्यांनी त्याला उत्तम पती असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.