रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांच्याबद्दल बी-टाऊन मध्ये नेहमीच चर्चा होत असतात. तसेच रणवीर आणि दीपिका दोघेही एकमेकांना आपल्या क्षेत्रातील कामातसुद्धा मदत करताना दिसून आले आहेत. तर आता मुंबई येथील एका लग्नात दीपिका आणि रणवीरने उपस्थिती लावली. पण लग्नात रणवीर दीपिकाची चप्पल हातात घेऊन तिच्या मागे फिरताना दिसून आला.
सोशल मीडियावर या लग्नाचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. त्यामध्ये रणवीर आणि दीपिका अप्रतिम दिसत आहे. तर लग्नात चक्क रणवीरने दीपिकाचे हिल्स असलेली सॅन्डल हातात धरलेले दिसून आले. तर दीपिका लग्नातील मंडळींसोबत हातमिळवणी करताना दिसत आहे.(हेही वाचा-दीपिका पदुकोण आणि विक्रांत मेसी यांचा 'छपाक' सिनेमातील Kissing Scene लीक (Viral Video)
या फोटोला नेटकऱ्यांकडून पसंदी मिळत आहे. तर काही नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत परफेक्ट नवरा असल्याची म्हटले आहे.