Oxford University मधून शिक्षण घेतलेली अंडरवर्ल्ड डॉनची 'ही' प्रेयसी तुम्हाला माहिती आहे का?
अबू सालेम (फोटो सौजन्य-ट्वीटर)

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम (Abu Salem) यांच्याशी प्रेमाचे नाते जोडलेल्या या प्रेयसीची सर्वत्र चर्चा पसरली होती. तसेच या प्रेयसीच्या प्रेम प्रकरणाचे पडसाद बॉलिवूडमध्ये ही दिसून आले. अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमच्या 'या' प्रेयसीने बॉलिवूड चित्रपटांमध्ये ही काम केले आहे.

अभिनेत्री मोनिका बेदी (Monica Bedi) हिचे आयुष्य एका चित्रपटाच्या कथेसारखे आहे. मोनिका हिचा जन्म 18 जानेवारी 1975 रोजी पंजाब मधील होशियापूर येथे झाला. परंतु तिचे नाव नंतर अबू सालेम याच्याशी जोडल्याने ती फार चर्चेत आली. मोनिकाच्या आयुष्याचे अनेक पैलू आहेत जे अद्याप जगासमोर आले नाहीत. मोनिका बेदी हिचे वडील पेशाने डॉक्टर होते. रिपोर्ट्सनुसार 1979 रोजी तिच्या आई-वडिलांनी नोर्वे येथे राहण्याचे ठरविले.

मोनिका बेदी (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

मोनिका हिने ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी मधून साहित्य अभ्यासक्रमाची तयारी करत होती. तसेच आपले स्वप्न पुर्ण करण्यासाठी मोनिकाने मुंबईत येण्याचे ठरविले. त्यानंतर चित्रपटात पदार्पण करण्यासाठी तिने प्रथम तेलगु चित्रपट 'ताजमहल' पासून सुरुवात केली. चित्रपटात खरं पाऊल ठेवले पण त्यावेळी तिची ओळख अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम याच्यासोबत झाली. यानंतर मोनिकाला बॉलिवूडमधील चित्रपट मिळण्यासोबत गुन्हेगारीच्या जगात तिचे नाव जोडले जाऊ लागले.(हेही वाचा-छोटा शकीलचा भाऊ अन्वर बाबू शेखला अटक; सोबत मिळाला पाकिस्तानी पासपोर्ट)

2002 रोजी अबू सालेमसह पोर्तुगाल मधून मोनिका हिला अटक करण्यात आली. परंतु एका सामान्य मुलीची अंडरवर्ल्ड डॉनशी कशी ओळख झाली हा प्रश्न नेहमीच उपस्थित राहिला. त्यावेळी एका मुलाखती दरम्यान मोनिकाने या प्रश्नावर उत्तर देत असे म्हटले की, अबू सालेम ह्याच्याशी तिची मैत्री फोनवरुन झाली होती. त्यावेळी मी दुबईत होती आणि माझा परिचय मी त्याला एक उद्योगपती म्हणून दिली होती. परंतु नंतर नंतर आमच्या दोघांतील संबंध वाढत जाऊन त्याच्यावर माझे प्रेम जडले होते. त्यानंतर खुप महिन्यांच्या कालावधी नंतर आम्ही दोघे भेटलो होतो. मात्र अबू सालेम हा नक्की कोण आहे हे मला माहिती नव्हते.

मोनिका बेदी हिने या सर्व प्रकारानंतर तुरुंगवासात शिक्षा ही भोगली आहे. मात्र 2008 रोजी तिने पुन्हा एकदा नव्याने उभे राहून बिग बॉस मध्ये एन्ट्री केली. त्यीवेळी मोनिकाने आपली वागणूक सर्वांशी नम्रतेने दाखविल्याने ती सर्वांच्या पसंदीस पडली. त्याचसोबत मोनिकाला रियॅलिटी शोमधून काम मिळू लागले. 'झलक दिखला जा', 'देसी गर्ल' या शोमधून ती झळकली. सध्या मोनिका सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. तर फिटनेस बाबत आपले व्यायामाचे व्हिडिओ नेहमीच पोस्ट करत असते.