Metro In Dino Gets New Release Date: प्रदर्शनाची तारीख बदलली, 'या' दिवशी होणार अनुराग बासू यांचा 'मेट्रो... इन दिनो' चित्रपट रिलीज
Metro In Dino MOvie

Metro In Dino Gets New Release Date: लाइफ इन अ मेट्रो या चित्रपटांचे दिग्दर्शक अनुराग बसू यांनी एका नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. गेल्या काही दिवसांपासून त्याचा आगामी चित्रपट मेट्रो.. इन दिनो (Metro in dino) हा चर्चेत आहेत. या चित्रपटसाठी प्रेक्षकांना आणखी काही वेळ प्रतिक्षा करावी लागणार आहे. हा चित्रपच या वर्षी मार्च महिन्याच्या 29 तारखेला चित्रपटगृहात रिलीज होणार असल्याची चर्चा होती पंरुत निर्मात्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली आहे.

हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला 13 सप्टेंबर 2024 ला येणार आहे. टी सीरिजने या संदर्भात माहिती प्रसारित केली.या चित्रपटात अनेक कलाकार झळकणार आहे. सारा अली खान, आदित्य रॉय कपूर, सारा अली खान, अनुपम खेर, नीना गुप्ता, पंकज त्रिपाठी, कोंकणा सेनशर्मा, अली यांचा समावेश आहे. चित्रपटाची निर्मिती टी-सीरीजचे भूषण कुमार आणि अनुराग बसू प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांनी केली आहे. यात प्रीतम यांचे शानदार संगीत असणार आहे.

हा चित्रपट , अनुराग बासूच्या 2007 मध्ये  प्रदर्शित झालेला 'लाइफ इन अ... मेट्रो' या चित्रपटाचा  सीक्वल आहे. या चित्रपटातील गाणी आज पण हिट आहेत. त्यामुळे  मेट्रो इन दिनो हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.