बॉलिवूडला टक्कर देत मराठी चित्रपट 'नाळ' IMBD च्या लिस्टमध्ये दाखल
Naal Movie | (Photo Credits- YouTube)

बॉलिवूडमध्ये परफेक्शनिस्ट म्हणून ओळख असणाऱ्या आमिर खानचा 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' हा प्रेक्षकांचा पसंतीस पडला नाही. तसेच या चित्रपटातील पात्रांवरुन त्यांना नेटकऱ्यांनी ट्रोलही केले. मात्र बॉलिवूडच्या चित्रपटांना टक्कर देत नागराज मंजुळे दिग्दर्शित  'नाळ' या चित्रपटाने IMBD च्या लिस्टमध्ये आपले नाव कोरले आहे.

2018 चे वर्ष संपत येणाच्या मार्गावर असताना बॉलिवूडमधील तीन बिग बजेट चित्रपट पुढील येत्या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या बिग बजेटमध्ये केदारनाथ, झीरो आणि सिंम्बा या चित्रपटाची नावे आहेत. मात्र तरीही मराठी चित्रपट 'नाळ' हा IMBD च्या सातव्या क्रमांकावर असल्याचे त्यांच्या लिस्टमध्ये दिसत आहे. तसेच सध्याच्या काळात प्रादेशिक भाषांमध्ये प्रदर्शित होणारे चित्रपट प्रेक्षक पाहत नसल्याचे दिसून येते.

तर प्रेक्षकांमध्ये मराठी पेक्षा हिंदी- इंग्रजी भाषांमधील चित्रपट पाहण्याची आवड जास्त असल्याचे कळते. परंतु 'नाळ' सारख्या मराठी चित्रपटाचे नाव IMBD मध्ये येणे ही मराठी इंडस्ट्रीसाठी मोठी अभिमानाची गोष्ट असल्याचे म्हणण्यास काही हरकत नाही.