
Lok Sabha Elections 2019: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी सुरुवात झाली आहे. तसेच राजकीय पक्षापासून ते सामान्य नागरिकांमध्ये मतदानासाठी उत्सुकता दिसून येत आहे. मतदान करणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क असून त्याने तो बजावला पाहिजे असे आवाहन मतादानापूर्वी केले जाते.
तर बॉलिवूड मधील कलाकारसुद्धा विविध कॅम्पेनच्या माध्यमातून मतदान करण्यासाठी नागरिकांमध्ये जागृकता निर्माण करतात. मात्र बॉलिवूड मधील असे काही दिग्गज कलाकार आहेत जे भारतात मतदान करु शकत नाहीत. तर पाहूयात कोण आहेत हे दिग्गज कलाकार.
- दीपिका पादुकोण
बॉलिवूड मधील स्टार आणि लोकप्रिय अभिनेत्री दीपिका पादुकोण ही नेहमी चर्चेत असते. तसेच तिचा लूक अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवतो. मात्र दीपिका भारतात मतदान करु शकत नाही. कारण तिचे वडील हे भारतीय असले तरीही तिचा जन्म डेन्मार्क कोपरनिगहेन येथे झाला असून तिच्याकडे डॅनिश (Danish) पासपोर्ट आहे.
-जॅकलीन फर्नांडिस
आपल्या अदा आणि बोल्ड अंदाजातून प्रेक्षकांवर आपली छाप पाडते. परंतु जॅकलीन हिचा जन्म Bahrain येथील Manama येथे झाला आहे. तर जॅकलिन हिचे वडील श्रीलंकेचे नागरिक आणि आई मलेशियाची नागरिक आहे.
-अक्षय कुमार
अक्षय कुमार ह्याचा जन्म पंजाब अमृतसर येथे झाला. मात्र तरीही तो भारताचाअधिकृतपणे नागरिक नाही आहे. तर त्याचा पासपोर्ट कॅनडाचा असून भारतीय नियमाप्रमाणे दोन देशांचे नागरिकत्व ठेवण्यास मान्यता नाही आहे.
-आलिया भट्ट
आलिया भट्ट भारतात मतदान करु शकत नाही. कारण तिची आई सोनी राजदन ही ब्रिटिश नागरिक आहे. त्यामुळे आलियाकडे ब्रिटिश पासपोर्ट आहे.
-कतरिना कैफ
कतरिना हिचा जन्म हॉंगकॉंगमध्ये झाला असून तिचे वडील कश्मिरी आहेत. त्यामुळे तिच्याकडे ब्रिटिश पासपोर्ट असल्याने ती भारतात मतदान करु शकत नाही.
तर आगामी लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी सर्व कलाकार मंडळी मतदान करताना दिसून येतात. तसेच मतदानाचा हक्क बजावत योग्य त्या उमेदवारास निवडणुक देण्याचे आवाहन करतात.