Kartik Aaryan आणि Karan Johar मध्ये मोठा वाद; 'Dostana 2' मधून अभिनेत्याला डच्चू- Reports
Kartik Aaryan & Karan Johar (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) यांच्यात मोठा वाद झाल्याची घटना समोर येत आहे. या वादामुळे करणने कार्तिक आर्यनला आगामी सिनेमा 'दोस्ताना 2' (Dostana 2) मधून डच्चू दिला आहे. यावरच करण थांबला नाही तर यापुढेही धर्मा प्रॉडक्शन (Dharma Productions) आणि त्याद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या उपक्रमात कार्तिकला सहभागी न करण्याची शथपही घेतली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कार्तिक आर्यनच्या बेजबाबदार वर्तवणूकीमुळे करणला नाईलाजाने हा निर्णय घ्यावा लागला आहे.

पीपिंग मून डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, कार्तिक दोस्ताना 2 साठी पुरेसा वेळ देऊ शकत नसल्याने निर्माते हैराण होते. याशिवाय सिनेमाच्या उत्तरार्धाबद्दल कार्तिक आणि निर्मात्यांमध्ये काही कलात्मक मतभेद होते. 2019 मध्ये स्क्रिप्ट ऐकल्यानंतरच कार्तिकने सिनेमासाठी होकार दिला होता. त्यावेळेस त्याने खटकणाऱ्या गोष्टी बोलून का नाही दाखवल्या, या प्रश्नाने निर्माते नाराज झाले आहेत.

या वादाला एक पर्सनल एंगल देखील दिला जात आहे. जान्हवी कपूर सोबत ब्रेकअप झाल्यानंतर कार्तिक दोस्ताना 2 सिनेमाच्या बाबतीत टंट्रम्स दाखवताना दिसत आहे. कार्तिक जानेवारीत जाह्नवी आणि त्याची बहीण खुशी कपूर यांच्या समवेत गोव्यात गेला होता. परंतु, त्यांच्यात काय घडले हे कोणालाही माहिती नाही. मात्र त्यानंतर खूप गोष्टी बदलल्याचे दिसून आले. जान्हवी आणि कार्तिकमध्ये नेमके काय घडले, याची कल्पना कोणालाच नाही.

विशेष म्हणजे दोस्ताना 2 वर लक्ष केंद्रीत करण्यासाठी कार्तिकने जान्हवीला मिस्टर. लेले सिनेमा साईन करण्यापासून रोखले होते, असेही काही मीडिया रिपोर्ट्समधून समोर आले आहे. त्यामुळे हा सिनेमा कियारा आडवाणी ला मिळाला. मात्र आता खुद्द कार्तिकच एक्स गर्लफ्रेंड जान्हवी कपूरसोबत काम करु इच्छित नसल्याचे चित्र दिसत आहे.