जान्हवी कपूर चा 'पीया तोसे नैना लागे' गाण्यावर बहारदार डान्स (Watch Video)
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर हिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओ जान्हवीचा बहारदार डान्स पाहायला मिळत आहे.
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) हिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओ जान्हवीचा बहारदार डान्स पाहायला मिळत आहे. बॉलिवूडचे हिट गाणे 'पीया तोसे नैना लागे' (Piya Tose Naina Lage Re) वर जान्हवीने अतिशय सुंदर डान्स केला आहे. या व्हिडिओला सोशल मीडियात चांगलीच पसंती मिळत आहे. या व्हिडिओत जान्हवीत श्रीदेवीची (Sridevi) झलक दिसत असल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे. हा बहारदार डान्स करताना जान्हवीने निळ्या रंगाचा कुर्ती परिधान असून त्यात ती अधिकच खुलून दिसत आहे. (दिवगंत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या स्मृतिदिनी जान्हवी कपूर झाली भावुक; 'तुझी दररोज आठवण येते' म्हणत शेअर केला आईसोबतचा जुना फोटो)
जान्हवीने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत त्यास कॅप्शन दिले की, "जेव्हा तुमचा तोल जातो तेव्हा तुम्हाला काहीतरी ड्रॉमेटिक शेवट करावा लागतो." जान्हवीने व्हिडिओला दिलेले कॅप्शन समजण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल.
जान्हवी कपूर पोस्ट:
गाईड सिनेमातील 'पीया तोसे नैना लागे' हे गाणे ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रहमान यांच्यावर चित्रित झालेले आहे. (बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने अनवाणी पायांनी 3 हजार 500 पायऱ्या चढत घेतले तिरुपतीचे दर्शन; पहा खास फोटो)
मराठमोळ्या सैराट सिनेमाचा हिंदी रिमेक 'धडक' मधून जान्हवीने बॉलिवूडमध्ये पर्दापण केले. त्यानंतर आता लवकरच ती 'तख्त' (Takht) या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय 'गुंजन सक्सेना' बायोपिक, 'रूही अफ्जा' (Roohi Afzana) आणि 'दोस्ताना 2' (Dostana 2) या सिनेमांसाठी देखील जान्हवीला कास्ट करण्यात आले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Feb 25, 2020 03:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

