Sridevi 2nd Death Anniversary: दिवगंत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या स्मृतिदिनी जान्हवी कपूर झाली भावुक; 'तुझी दररोज आठवण येते' म्हणत शेअर केला आईसोबतचा जुना फोटो

श्रीदेवी यांच्या निधनाचा सर्वात मोठा धक्का त्यांचे पती बोनी कपूर तसेच मुली जान्हवी आणि खुषीला बसला होता. जान्हवी कपूर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून आई श्रीदेवीचे फोटो शेअर करत असते. आजही जान्हवीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आईसोबतचा बालपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला जान्हवीने 'तुझी दररोज आठवण येते,' अशी कॅप्शन दिली आहे.

Sridevi 2nd Death Anniversary: दिवगंत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या स्मृतिदिनी जान्हवी कपूर झाली भावुक; 'तुझी दररोज आठवण येते' म्हणत शेअर केला आईसोबतचा जुना फोटो
Sridevi 2nd Death Anniversary (PC - Instagram)

बॉलिवूडची चांदणी म्हणजे दिवगंत अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांचा आज दुसरा स्मृतिदिन (2nd Death Anniversary). श्रीदेवी यांच्या निधनामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टी हळहळली होती. आज त्यांना जाऊन दोन वर्ष झाली. श्रीदेवीचे चाहते तसेच त्यांचे कुटुंबिय आजही या कारणामुळे भावूक होतात.

श्रीदेवी यांच्या निधनाचा सर्वात मोठा धक्का त्यांचे पती बोनी कपूर (Boney Kapoor) तसेच मुली जान्हवी आणि खुषीला बसला होता. जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून आई श्रीदेवीचे फोटो शेअर करत असते. आजही जान्हवीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आईसोबतचा बालपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला जान्हवीने 'तुझी दररोज आठवण येते,' अशी कॅप्शन दिली आहे. (हेही वाचा - बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या देसी लूकवर चाहते फिदा; पहा लाल साडीतील खास फोटो)

 

View this post on Instagram

 

Miss you everyday

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on

या पोस्टवरून जान्हवी आई श्रीदेवी यांच्या आठवणीत भावूक झाली आहे. जान्हवीचा पहिला चित्रपट 'धडक' प्रदर्शित होण्यापूर्वीच श्रीदेवी यांनी जगाचा निरोप घेतला. श्रीदेवी आपल्या मुलीला पडद्यावर पाहण्यासाठी नेहमी उत्सुक असतं. मात्र, त्यांची ही इच्छा अपूरी राहिली. जान्हवी लवकरचं आगामी चित्रपट 'कारगिल गर्ल गुंजन सक्सेना' यांच्या जीवनावर आधारित बायोपिकमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Sridevi 2nd Death Anniversary: जान्हवी कपूर झाली भावुक; शेअर केला आईसोबतचा जुना फोटो  Watch Video 

तसेच दिग्दर्शक करण जोहरच्या 'तख्त' चित्रपटातदेखील जान्हवी महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. याशिवाय अभिनेता राजकुमार रावसोबत 'रुही अफ्जा' या चित्रपटात ती मुख्य अभिनेत्रीची भूमिका करणार आहे.

(The above story first appeared on LatestLY on Feb 24, 2020 10:37 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).