
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने (Janhvi Kapoor) अनवाणी पायांनी 3 हजार 500 पायऱ्या चढत तिरुपतीचे (Tirupati) दर्शन घेतले आहे. जान्हवीने भगवान वेंकटेश्वराच्या दर्शनासाठी अनवाणी पायांनी 12 किमी टेकडी चढली आहे. जान्हवी कपूरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिरुपतीचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये जान्हवीने पांढऱ्या रंगाच्या सलवार कमीज घातला असून त्यावर पिवळ्या रंगाची ओढणी घेतली आहे. अनवाणी पायाने 3 हजारांपेक्षा जास्त पायऱ्या चढल्याने जान्हवी मध्येचं थांबून फोटोशूट करतानाही दिसली.
जान्हवी कपूर तसेच बोनी कपूर यांची तिरुपती मंदिरावर श्रद्धा आहे. त्यामुळे बोनी कपूर तसेच जान्हवी कपूर वर्षातून एकदा तरी तिरुपतीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेत असतात. यावेळी जान्हवीसोबत तिची लहान बहिण खुशी कपूरही तिरुपतीच्या दर्शनाला आली होती. (हेही वाचा - दलदलीत अडकलेल्या तरुणाला माकडाने दिला मदतीचा हात; रेस्क्यू ऑपरेशन करतानाचा 'हा' फोटो सोशल मीडियावर होतोय व्हायरल)
सध्या जान्हवी 3 चित्रपटांच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. विशेष म्हणजे जान्हवीने 'गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल' या चित्रपटाचे शुटिंग पूर्ण केले आहे. तसेच ती राजकुमार रावसोबत ‘रूही अफ्जा’ या सिनेमात मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारणार आहे. सध्या जान्हवी 'दोस्ताना 2' चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यक्त आहे.