Monkey gives helping hand for Man (PC - Facebook)

आतापर्यंत तुम्ही संकटात सापडलेल्या अनेक प्राण्यांना जीवनदान दिल्याच्या बातम्या ऐकल्या असतील. तसेच सोशल मीडियावर या घटनांचे फोटोही पाहिले असतील. सध्या सोशल मीडियावर एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये चक्क एका माकडाने (Orangutan) दलदलीत अडकलेल्या तरुणाला मदतीचा हात दिला आहे. हे रेस्क्यू ऑपरेशन (Rescue Operation) करतानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या चिंपांझीचं नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे.

हा व्हिडिओ आशिया खंडातील बोर्निया जंगलातला आहे. या फोटोत एक Orangutan नदीत पडलेल्या एका व्यक्तीला बाहेर येण्यासाठी मदतीचा हात पुढे करताना पाहायला मिळत आहे. इंडोनेशियात चिंपांझीच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या एका व्यक्तीने 8 डिसेंबर रोजी हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं होतं. 6 फेब्रुवारी रोजी हा फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला होता. त्यानंतर हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. या फोटोवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

माकडाची मदत करण्याची प्रवृत्ती पाहून नेटिझन्सनी त्याचं कौतुक केलं आहे. या फोटोवरून प्राण्यांमध्येही माणुसकीची भावना असल्याचा प्रत्यय आला आहे. यापूर्वीही सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अनेक फोटोमधून प्राण्यांमधील माणुसकीचा प्रत्यय आला आहे. त्यामुळे मानवानेही प्राण्यांप्रती माणुसकीची भावना जपायला हवी.