बॉलिवूडची हॉट अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आणि मुलगा तैमूर सोशल मिडियावर बरेच चर्चेत असतात. तैमूर हा बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध असा स्टारकिड आहे. त्याचे प्रत्येक हावभाव, त्याच्या क्रिया टिपण्यासाठी अनेकदा तो मिडियाच्या गराड्यात असतो. तैमूरचे (Taimur) ते निखळ हावभाव त्याच्या चाहत्यांना अक्षरश: वेडं लावतात. त्याच धर्तीवर करीना आणि तैमूरचा एक क्युट व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत करीना तैमूर सह 'शार्क डू डू' या लहान मुलांच्या सध्याच्या प्रसिद्ध गाण्यावर थिरकताना दिसत आहे आणि हा डान्स मुलगा तैमूरही एन्जॉय करताना दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये करीना, तैमूर आणि सोहा अली खान ची मुलगी इनाया (Inaya) 'Shark Do Do' या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. या तिघांचा धमाल मस्तीचा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
हेदेखील वाचा- 'या' कारणामुळे तैमूरला करिना कपूर युरोप येथे सोडून मुंबईत दाखल
या व्हिडिओमध्ये तैमूर, करीना आणि इनाया तिघेही खूप एन्जॉय करताना दिसत आहे. सोहा अली खानही त्यांना प्रोत्साहन देत असलेली पाहायला मिळत आहे.
तैमूर हा स्टारकिड असून त्याच्या जगात येण्यापूर्वीच तो बराच चर्चेत होता. त्याचा जन्म झाल्यापासून ते आतापर्यंत मिडियाचा कॅमेरा त्याच्यावरुन काही हटला नाही. त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावरा व्हायरल होत असतात.