'या' कारणामुळे तैमूरला करिना कपूर युरोप येथे सोडून मुंबईत दाखल
Kareena Kapoor (Photo Credits-Instagram)

सध्या करिना कपूर (Kareena kapoor) परिवारासोबत युरोप (Europe) ट्रिपवर सुट्टीसाठी गेली आहे. तसेच करिश्मा हिने तैमूर याचे सुट्टीवर आलेल्या तैमूरचे फोटोसुद्धा सोशल मीडियात पोस्ट केले आहेत. परंतु अचानक करिना हिला तैमूरला युरोप येथून चक्क 12 तासांसाठी सोडून पुन्हा भारतात यावे लागले आहे.

पिंकविला यांनी दिलेल्या रिपोर्टनुसार, करिना मुंबईत 12 तासांसाठी आली आहे. मात्र तिच्यासोबत तैमूर आणि सैफ अली खान परतले नाही आहेत. करिनारियॅलिटी शो डान्स इंडिया डान्सच्या शूटिंगसाठी मुंबईत आली आहे. त्यामुळे युरोप येथे सुट्टी घालवत असलेल्या करिनाता तैमूरला तेथच सोडावे लागले आहे. (सारखे फोटो काढणे थांबवा! तैमूर आंधळा होईल, विमानतळावर सैफ अली खान फोटोग्राफर्सवर भडकला)

 

View this post on Instagram

 

Lazy Saturday 😂 #holidays @therealkarismakapoor

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

तर डान्स इंडिया डान्सचे शुटींग पूर्ण झाल्यावर  करिना रात्रीच्या विमानाने पुन्हा एकदा सुट्टी घालवण्यासाठी युरोपला जाणार आहे. पहिल्यांदाच करिना कपूर टेलिव्हिजनवर आपले पाऊल टाकत आहे. डान्स इंडिया डान्स या शोच्या माध्यमातून करिना परिक्षक म्हणून दिसणार आहे. टेलिव्हिजनवर सर्वात जास्त मानधन स्विकारणाऱ्यांध्ये करिना अव्वल ठरली असल्याचा बोलबाला सुरु आहे.