Kangana Ranaut Tested COVID Positive: बॉलिवूडची क्वीन कंगना रनौत अडकली कोरोनाच्या जाळ्यात, अभिनेत्रीची कोविड चाचणी आली पॉझिटिव्ह
कंगना रनौत (Photo Credit : Twitter)

Kangana Ranaut Tested COVID Postive:बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांना तसेच दिग्गज व्यक्तींना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दर दिवसा कानावर ऐकायला मिळत आहे. काल शिल्पा शेट्टी हिच्या कुटूंबाला कोरोनाची लागण झाल्याची बातमी ऐकायला मिळते न मिळते तोच आज अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तिने स्वत:ला होम क्वारंटाईन केले असून डॉक्टरांच्या सल्ल्याखाली ती सर्व नियमांचे पालन करत उपचार घेत आहेत. कंगना रनौत हिने इन्स्टाग्राम पोस्ट टाकून याबाबत माहिती दिली आहे.

"मला मागील काही दिवसांपासून थोडं बरं वाटत नव्हतं आणि थकवाही जाणवत होता. त्यामुळे मी हिमाचलला जाण्याचा विचार करत होते. मी काल कोरोनाची चाचणी केली आणि त्याचे आज रिपोर्ट्स आले असून मला कोरोना झाल्याचे आढळले आहे." अशी पोस्ट तिने केली आहे.हेदेखील वाचा- Shilpa Shetty च्या घराला कोरोनाने घेरलं! मुलगी Samisha सह घरातील सर्वांना दहा दिवसांपूर्वी झाली कोरोनाची लागण, अभिनेत्रीने शेअर केला अनुभव

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

"मला कळलंच नाही कोरोनाने माझ्या शरीरात कधी शिरकाव केला ते. कोरोनाला घाबरू नका. जेवढं तुम्ही त्याला घाबराल, तेवढा जास्त तो तुम्हाला घाबरवेल. कोरोनाशी लढून त्याला नष्ट करा" असा सल्ला तिने चाहत्यांना दिला आहे.

कंगनाआधी रणबीर कपूर, दिपिका पादुकोण, आलिया भट, विकी कौशल, कार्तिक आर्यन यांच्यासह अनेक दिग्गजांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे सर्वांनी घरी राहा आणि सुरक्षित राहा असा सल्ला कलाकारांकडून देण्यात येत आहे.