Shilpa Shetty च्या घराला कोरोनाने घेरलं! मुलगी Samisha सह घरातील सर्वांना दहा दिवसांपूर्वी झाली कोरोनाची लागण, अभिनेत्रीने शेअर केला अनुभव
Shilpa Shetty Family (Photo Credits: Instagram)

कोरोनाने आतापर्यंत अनेक बॉलिवूड स्टार्सला आपल्या जाळ्यात ओढले असून आता तर कोरोना त्यांच्या पूर्ण कुटूंबाला आपल्या जाळ्यात ओढू लागलाय. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिच्या पती, मुलांसह तिच्या सासू-सास-यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. सुदैवाने शिल्पाची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. मात्र मुलगी समीशा (Samisha), पती राज कुंद्रा (Raj Kundra), मुलगा वियान (Viaan) आणि तिच्या सासू-सास-यांना दहा दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. तसेच तिच्या घरातील 2 कर्मचा-यांना देखील कोरोनाची लागण झाल्याने गेल्या 10 दिवसांपासून त्यांचे घर कोरोनाच्या सावटाखाली आहे. शिल्पाने सोशल मिडियाद्वारे ही माहिती दिली आहे.

शिल्पा शेट्टीने इन्स्टाग्रामवर पोस्ट करुन याबाबत माहिती दिली आहे. 'मागील 10 दिवस आमच्या कुटूंबासाठी खूपच कठीण काळ होता. माझ्या सासू-सास-यांसह, मुलगी समीशा, मुलगा वियान, माझी आई आणि माझे पती राज यांना कोरोनाची लागण झाली.' असे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे.हेदेखील वाचा- अभिनेत्री Deepika Padukone च्या संपूर्ण कुटुंबाला Covid-19 ची लागण; वडील Prakash Padukone रुग्णालयात भरती, तर आई व बहिण घरीच आयसोलेट

"हे सर्व आपापल्या रुममध्ये आयसोलेट असून डॉक्टरांच्या निदर्शनाखाली उपचार घेत आहेत. माझी कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. तसेच माझ्या घरातील अन्य दोन व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावरही उपचार सुरु आहेत. या सर्वांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून लवकरच बरे होण्याच्या मार्गावर आहेत." असं शिल्पाने सांगितले.

त्याचबरोबर या कठीण काळात मुंबई महानगरपालिकेने केलेल्या सहकार्याबद्द्ल शिल्पाने आभार मानले आहेत. त्याचबरोबर आपल्या कुटूंबासाठी केलेल्या प्रार्थनांबद्दल शिल्पाने सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. मास्क लावा, हात वारंवार सॅनिटाईज करा, स्वत:ची काळजी घ्या असे आवाहन शिल्पाने सर्वांना केले आहे. शिल्पाच्या या पोस्टवर वरुण धवन, माधुरी दीक्षित, कार्तिक आर्यन, भूमी पेडणेकर, मलायका अरोरा यांसह अनेक स्टार्सनी त्यांच्या निरोगी स्वास्थ्यासाठी प्रार्थना केली आहे.