'Black Lives Matter' ला पाठिंबा दर्शवणाऱ्या बॉलिवूड कलाकारांवर कंगना रनौत हिने साधला निशाणा; पहा व्हिडिओ
Kangna Ranaut (Photo Credits: Instagram)

अमेरिकेतील मिनियापोलिस शहरामध्ये जॉर्ज फ्लॉयड नामक कृष्णवर्णीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर अमेरिकेत ‘Black Lives Matter' ही मोहिम उभी राहिली. या मोहिमेला जगभरातील अनेक देशांमधून पाठिंबा मिळत आहे. यात अनेक बॉलिवूड कलाकारांनी उडी घेत आपला निषेध नोंदवला आहे. यावरुन बॉलिवूडची क्विन कंगना रनौत (Kangana Ranaut) हिने बॉलिवूड सेलिब्रेटींवर निशाणा साधला आहे. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत कंगना म्हणाली, "पश्चिमी देशांसबंधित Bandwagon चा भाग होणे ही सध्या फॅशन झाली आहे. परंतु, आशियातील अनेक कलाकार आणि मान्यवर आपल्या देशात घडणाऱ्या घटनांवर मौन पाळणे पसंत करतात. अमेरिकेतील सामाजिक-राजकीय सुधारणांमध्ये हे का सहभागी होतात, हे मला समजत नाही." तसंच ती पुढे म्हणाली, "काही आठवड्यांपूर्वी पालघरमध्ये दोन साधूंना जमावाने ठार मारले. या दुर्दैवी घटनेत कोणीही एक शब्द देखील बोलले नाही."

कंगना आपल्या अभिनय कौशल्यासह बिनधास्त आणि बेधडक वक्तव्यांसाठी खूप प्रसिद्ध आहे. Black Lives Matter संदर्भातही बॉलिवूड कलाकारांबद्दल कंगनाने केलेल्या रोखठोक वक्तव्याची व्हिडिओ क्लिप इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आली आहे. ('All Lives Matter' म्हणत सारा अली खान हिची पोस्ट; ट्रोलिंग कमेंट्सनंतर साराकडून पोस्ट डिलिट)

पहा व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

Talking about lynching of sadhus in Mumbai !!!

A post shared by Kangana Ranaut (@team_kangana_ranaut) on

तसंच कंगना पुढे म्हणाली, "बॉलिवूडचे अनेक अभिनेते आणि अभिनेत्री फेअरनेस क्रिमच्या जाहीराती करतात आणि आता वर्णभेदाविरुद्ध आवाज उठवत आहेत. भारतातील अनेक प्रसिद्ध आणि यशस्वी व्यक्ती सर्व प्रकारच्या फेअरनेस प्रॉडक्टसचे समर्थन करतात. मात्र मी त्याला अपवाद आहे. असे लोक आता निर्ल्लजपणे कृष्णवर्णीयांच्या समर्थनार्थ उभे आहेत. त्यांची इतकी हिंमत कशी झाली? त्यांना कोणी का नाही हा प्रश्न विचारत?" असा थेट सवालही तिने विचारला. "आता अचानक कृष्णवर्णीय व्यक्तींबद्दल भावना कशा निर्माण झाल्या? आणि मग आता फेअरनेस प्रॉडक्ट्स कंपन्यांसह केलेल्या लाखो डॉलर्सच्या कराराचे काय?" असा सवाल विचारत तिने बॉलिवूडकरांवर निशाणा साधला आहे.