लॉकडाऊनच्या काळात कल्की कोचलिन आपल्या गोंडस मुलीसह खेळतानाचे सुंदर क्षण कॅमे-यात कैद, नक्की पाहा
Kalki Koechlin (Photo Credits: Instagram)

कोविड-19 मुळे देशभरात सर्वत्र लॉकडाऊन ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सामान्य माणसापासून सर्व कलाकार सध्या आपल्या घरात आपल्या कुटूंबासोबत छान वेळ घालवत आहे. हा वेळ प्रत्येक कलाकारासाठी खूप चांगला वेळ असल्यामुळे आपल्या घरी सर्व छान एन्जॉय करताना दिसत आहे. यात फेब्रुवारीमध्ये एका गोंडस मुलीला जन्म देणारी कल्की कोचलिन (Kalki Koechlin)  देखील आपल्या मुलगी साफो सह छान वेळ घालवताना दिसत आहे. लग्नाआधीच गरोदर राहिल्यामुळे तिच्यावर अनेक लोकांनी टिका केली होती. मात्र त्या सर्वांना सडेतोड उत्तर देत तिने फेब्रुवारीमध्ये साफोला जन्म दिला.

आपल्या या गोंडस मुलीसह ती छान वेळ घालवत आहे. या फोटोत ती साफोला आपल्या मांडीवर घेऊन बसली आहे. साफो देखील छान एन्जॉय करत असून खळखून हसताना या फोटोमध्ये दिसत आहे. बॉलिवूड अभिनेत्री कल्की कोचलीन हिच्याकडून कन्यारत्नाचे नामकरण; पहा का ठेवलं हेचं नाव

पाहा फोटो:

 

View this post on Instagram

 

Covid times #loveatfirstsmile 📷@guyhershberg

A post shared by Kalki (@kalkikanmani) on

साफो नावाची कवयित्री प्रचंड लोकप्रिय होती. त्यामुळे कल्कीने आपल्या बाळाचं नाव 'साफो' असं ठेवलं आहे. कल्की मागील दोन वर्षांपासून गाय हर्शबर्ग या आपल्या प्रियकरासोबत सोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहते आहे. कल्कीच्या गरोदरपणात तिने अनेकदा आपल्या बेबी बंप सोबत स्टायलिश फोटो शूट केले होते.