लग्नाअगोदरच आई होणारी अभिनेत्री कल्की कोचलिनने बेबी बंपसोबत केलं फोटोशूट; पाहा खास फोटो
Kalki Koechlin Baby Bump (PC- Instagram)

लग्नाअगोदरच आई होणारी अभिनेत्री कल्की कोचलिनने (Kalki Koechlin) बेबी बंपसोबत फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये कल्कीच्या चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो दिसत असून ती अगदी तंदुस्त दिसत आहे. कल्कीने 'ग्राझिया' मॅगझिनसाठी फोटोशूट केलं होतं. या फोटोमध्ये कल्की पेस्टल रंगाच्या आऊटफिटमध्ये आणि लाइट मेकअपमध्ये सुंदर दिसत आहे.

कल्की तिच्या हटके भूमिकांमुळे जितकी प्रसिद्ध झाली त्याच्यापेक्षा जास्त चर्चेत आली ती तिला लग्नाआधी आलेले गरोदरपण. कल्की आई होणार आहे ही बातमी कळताच तिच्या चाहत्यांच्या भुवया उंचावल्या. मात्र, कल्कीला आपण गरोदर आहोत असे पहिले 2 महिने कळलेच नव्हते असे 'मिड डे' ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. 'माझ्यासाठी हा धक्काच होता. मात्र, जेव्हा मी माझ्या बाळाच्या हृद्याचे ठोके ऐकले तेव्हा मी हे गरोदरपण मनापासून स्विकारले,' असेही तिने सांगितलं होतं. (हेही वाचा - गरोदर आहे म्हणून मी लग्न करणार नाही; असे म्हणत अभिनेत्री कल्की कोचलिन यांनी समाजव्यवस्थेवर बोट दाखवत मांडले परखड मत)

कल्की सध्या क्लासिकल पियॉनिस्ट Guy Hershberg याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. 'देव डी' या चित्रपटाच्या सेटवर कल्की दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या प्रेमात पडली होती. त्यानंतर 2011 मध्ये दोघांनीही लग्न केले होते. परंतु, हे नाते फार काळ टिकले नाही. 2015 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. मात्र असे असले तरी घटस्फोटानंतरही कल्की व अनुराग कश्यप एकमेकांचे चांगले मित्र आहेत. दरम्यान, एका मुलाखतीत कल्कीने सांगितले की, मी आणि हर्शबर्ग आताच लग्न करणार नाही. परंतु, मुलाच्या शाळेसाठी किंवा कागदपत्रांसाठी गरज भासल्यास आम्ही लग्नाबद्दल विचार करू. परंतु, तोपर्यंत आम्ही एकमेकांशी प्रामाणिक आहोत.'