 
                                                                 अभिनेत्री कल्की कोचलीन (Kalki Koechlin) तिच्या हटके भूमिकांमुळे जितकी प्रसिद्ध झाली त्याच्यापेक्षा जास्त चर्चेत आली ती तिला लग्नाआधी आलेले गरोदरपण. ती आई होणार आहे ही बातमी कळताच तिच्या चाहत्यांच्या भुवया उंचावल्या. मात्र कल्कीला आपण गरोदर आहोत असे पहिले 2 महिने कळलेच नव्हते असे तिने 'मिड डे' ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. "माझ्यासाठी हा धक्काच होता, मात्र जेव्हा मी माझ्या बाळाच्या हृद्याचे ठोके ऐकले तेव्हा मी हे गरोदरपण मनापासून स्विकारले," असेही ते म्हणाले.
'मिड डे' ला दिलेल्या मुलाखतीत तिने आपल्या गरोदरपणाबाबत अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. सुरुवातीला आपल्यावर अनेक लोकांनी बोट दाखवले कारण मी कुमारी माता बनली होती. सोशल मिडियावरही मला बरेच ट्रोल केले. पण मी खचले नाही. या मुलाखतीत तिला तिच्या लग्नाविषयी विचारले असता, "आम्हाला लग्न करण्यात काही अडचण नाही, मात्र मी केवळ लग्नाआधी गरोदर आहे म्हणून लग्न करणे ही गोष्ट मला रुचत नाही," असे सांगत तिने आपल्या समाजव्यवस्थेवर आपले मत मांडले आहे.
तसेच जर आमच्या बाळाच्या शाळेसाठी किंवा कागदपत्रांसाठी काही गरज पडली तरच आम्ही लग्नाबाबत विचार करु असेही ती या मुलाखतीत म्हणाली.
हेदेखील वाचा- प्रेग्नंट कल्की कोचीन ला पाहून करीना ला झाली आपल्या गरोदरपणाची आठवण, दिली अशी मिश्किल प्रतिक्रिया
                    
मात्र सध्यातरी मी आणि माझा बॉयफ्रेंड आपल्या मतांवर ठाम असून आम्ही आमच्या प्रेमाशी वचनबद्ध आहोत आणि आपल्या कुटूंबाशी प्रामाणिक आहोत, असेही ती म्हणाली.
कल्कि हिच्या ब्रॉयफ्रेंडचे नाव Guy Hershberg असून तो पेशाने क्लासिकल पियॉनिस्ट आहे. हर्शबर्ग सध्या मुंबईत राहत आहे. सुत्रांच्या मते हर्शबर्ग जनावरांसाठी काम करणाऱ्या एका एनजीओ संबंधित जोडला गेला आहे. गेल्या महिन्यातच कल्कि हिने हर्शबर्ग याच्यासोबत एक फोटो शेअर केला असून दोघे समुद्राच्या येथे मजामस्ती करताना दिसून येत आहेत.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
