Jacqueline Fernandez Hot Photo: जॅकलिन फर्नांडिसने कूपिंग थेरपीनंतर शेअर केला हॉट फोटो; निशान पाहून चाहत्यांनी दिल्या मजेशीर प्रतिक्रिया
जॅकलीन फर्नांडिस (Photo Credits: Instagram)

Jacqueline Fernandez Hot Photo: बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिची आज कपिंग थेरपी झाली. यानंतर जॅकलिनने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाची ब्रा परिधान केली आहे. यात ती अतिशय हॉट अंदाजात दिसत आहे. जॅकलिनने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर लोकांचा गोंधळ उडाला आहे.

या फोटोमध्ये जॅकलिनच्या खांद्याच्या मागील बाजूस हृदयाच्या आकाराची खूण दिसत आहे. हा फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांना असे वाटले की, तिने आपल्या शरीरावर हा नवीन टॅटू बनविला आहे. तथापि, हा फोटो काळजीपूर्वक पाहिल्यानंतर असे दिसून आले की, अभिनेत्रीने कॅपिंग थेरपी केली होती. याचा फोटो तिने शेअर केला आहे. (वाचा - Dil Hai Deewana Teaser: अर्जुन कपूर आणि रकुल प्रीत यांच्या 'दिल है दिवाना' गाण्याचा टीझर रिलीज; Watch Video)

हा फोटो पोस्ट करताना जॅकलिनने "आई एम हूक्ड," असं कॅप्शन दिलं आहे. याबरोबरच तिने या पोस्टमध्ये आपल्या कपिंग थेरपिस्टला टॅग देखील केले आहे. हा फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. ज्यात बहुतेक लोकांना जॅकलिनने टॅटू बनवला असल्याचं वाटलं.

जॅकलिनच्या आधी दिशा पटानी, टायगर श्रॉफ यांच्यासह अनेक सेलिब्रिटींना कपिंग थेरपी केली आहे. आता श्रीलंकन सौंदर्यवतीनेही या यादीतील एक भाग बनली आहे.