Dil Hai Deewana Teaser: अर्जुन कपूर आणि रकुल प्रीत यांच्या 'दिल है दिवाना' गाण्याचा टीझर रिलीज; Watch Video
Dil Hai Deewana Teaser (PC - Instagram)

Dil Hai Deewana Teaser: अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) लवकरचं 'दिल है दिवाना' या गाण्यात दिसणार आहेत. आज या गाण्याचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. यात अर्जुन आणि रकुल डान्स करताना दिसत आहेत. हे गाणं तनिष्क बागची यांनी संगीतबद्ध केलं आहे. 'दिल है दिवाना' गाण्याचे दिग्दर्शन राधिका राव आणि विनय सप्रू यांनी केलं आहे. या गाण्याला दर्शन रावल आणि जारा खान यांनी आवाज दिला आहे. हे गाणे शब्बीर अहमद यांनी लिहिले आहे. टी-सीरिजच्या बॅनरखाली या गाण्याची निर्मिती करण्यात आली आहे.

टीझरमध्ये अर्जुन कपूर आणि रकुल प्रीत सिंह यांची जोडी अप्रिम दिसत आहे. टीझरच्या सुरूवातीस काही संवाद ऐकायला मिळतो. ज्यामध्ये ऐकायला येत आहे की, 'जेव्हा त्याने तिला पाहिलं, तेव्हा मन उडायला लागलं.' तसेच यावेळी अनिल कपूर यांच्या राम लखन चित्रपटातील 'धिना धिन धा' गाणं ऐकायला येत आहे. या गाण्यात अर्जुन कपूर आणि रकुल प्रीत दोघांची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. (वाचा -Dhamaka Film: नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार Kartik Aaryan चा 'धमाका' चित्रपट; ओटीटी प्लॅटफॉर्मने तब्बल 135 कोटींमध्ये विकत घेतले हक्क)

या गाण्याबद्दल बोलताना भूषण कुमार म्हणतात, "दिल है दिवाना हे असे नृत्य गाणे आहे जे नि: संदिग्धपणे आपल्याला नाचवेल. या मजेदार संगीत व्हिडिओमध्ये अर्जुन आणि रकुल खूप उत्साही आणि सक्रिय दिसत आहेत. मला आशा आहे की, हे गाणे प्रेक्षकांनाही खूप आवडेल."

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

दरम्यान, गाण्याबद्दल बोलताना दिग्दर्शक राधिका राव आणि विनय सप्रू म्हणतात, "आमच्या गाण्यांमध्ये आणि चित्रपटांमध्ये सहसा परीकथा असते. पण 'दिल है दिवाना' च्या सहाय्याने आम्ही यात बदल घडवून आणला आहे आणि त्यात 2.O व्हर्जनचा टेम्पर टाकला आहे. या चित्रपटाच्या कथेत अर्जून आणि रकूल उत्तम प्रकारे फिट आहेत. अर्जुन आणि रकुल यांचे 'दिल है दिवाना' हे गाणे 17 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे.