Irrfan Khan and his sons (Photo Credits: Insta, Yogen Shah)

आज, 29 एप्रिल 2020 रोजी अष्टपैलू अभिनेता इरफान खान (Irrfan Khan) यांचे वयाच्या 53 व्या वर्षी निधन झाले. इरफान खान, 2018 पासून एका दुर्मिळ प्रकारच्या कर्करोगाशी झुंज देत होते. मुंबईच्या कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 28 एप्रिल रोजी संध्याकाळी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर लगेच कोलन संसर्गावर उपचार सुरु केले गेले होते. मात्र त्याचा काही फायदा झाला नाही व आज खान यांची प्राणज्योत मालवली. आता, ताज्या माहितीनुसार, इरफान खान यांचे अंतिम संस्कार बुधवारी दुपारी झाले. त्यांना मुंबईतील वर्सोवा कब्रस्तान (Versova Kabristan) येथे दफन करण्यात आले.

इरफान खान यांची दोन मुले बबील (Babil) आणि अयान (Ayan) यांनी त्यांचे शेवटचे क्रियाकर्म केले. इरफान खान यांच्या प्रतिनिधीने दिलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे, ‘इरफान खान यांचे निधन झाल्याची बातमी बाहेर आल्यानंतर, आज दुपारी 3 वाजता मुंबईतील वर्सोवा कब्रस्तान येथे त्यांचे दफन करण्यात आले. यावेळी उपस्थिती लोकांमध्ये त्याचे कुटुंब, जवळचे नातेवाईक आणि मित्र होते. यावेळी प्रत्येकाने त्यांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यांचे निधन झाल्याबद्दल शोक व्यक्त केला. आम्ही सर्वजणच त्यांच्या शांतीसाठी प्रार्थना करत आहोत.’ (हेही वाचा: इरफान खान यांचे निधन हे जागतिक सिनेमाचे नुकसान! पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांनी ट्विट मार्फत वाहिली श्रद्धांजली)

Irrfan khan dies:नरेंद्र मोदी,अमिताभ बच्चन,सचिन तेंडुलकर यांनी ट्वीट करुन इरफानला वाहिली श्रद्धांजली - Watch Video

दरम्यान, देशात कोरोना व्हायरसमुळे लॉक डाऊन चालू आहे. अशात इरफान यांचे अनेक जवळचे नातेवाईक, मित्र, इंडस्ट्रीमधील लोक त्यांच्या अंत्ययात्रेसाठी उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र सोशल मिडियाच्या माद्यमातून अनेक अनेक सेलिब्रिटींनी खान यांच्या जाण्याबाबत दुःख व्यक्त केले. यावेळी दिग्दर्शक विशाल भारद्वाज हे इरफान यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कब्रिस्तानमध्ये उपस्थित होते. विशाल भारद्वाज यांच्यासोबत इरफान खान यांनी 'हैदर' आणि '7 खुन माफ' अशा चित्रपटांमध्ये काम केले आहे.