PM Modi Reacts On Irfan Khan Death (Photo Credits: Facebook)

बॉलिवूड अभिनेता इरफान खान (Irrfan Khan) यांचे आज 29 एप्रिल रोजी निधन झाले. मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात आज वयाच्या 54 व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. 2018 पासून ते Neuroendocrine Tumour या अतिशय गंभीर कर्करोगाशी इरफान यांनी लढा दिला होता. आज त्यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळापासून ते बॉलिवूडकर मंडळींनी, क्रिकेट जगतातील खेळाडूंनी दुःख व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सुद्धा काही वेळेपूर्वीच ट्विट च्या माध्यमातून इरफान खान यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तर, इरफान खान यांच्या निधनानंतर राहुल गांधी यांनी सुद्धा खेद व्यक्त केला आहे. (इरफान खान यांच्या निधनावर अमिताभ बच्चन, लता मंगेशकर, अरविंद केजरीवाल, सुप्रिया सुळे यांच्या सहित 'या' दिग्गजांनी व्यक्त केला शोक)

"इरफान खान यांचे निधन म्हणजे सिनेमा आणि नाटक अशा एकूणच कलाविश्वाचे मोठे नुकसान आहे. वेगवेगळ्या माध्यमांमध्ये त्याच्या अष्टपैलू कामगिरीमुळे त्यांची आठवण होईल. त्याचे कुटुंब, मित्र आणि चाहते यांना या कठीण काळी बळ मिळो ही सदिच्छा त्यांच्या आत्म्यास शांती लाभो!" अशा आशयाचे ट्विट नरेंद्र मोदी यांनी केले आहे. Irrfan Khan Dies: इरफान खान याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्रद्धांजली; ट्विट करत व्यक्त केल्या भावना

नरेंद्र मोदी ट्विट

इरफान खान यांच्या निधनानंतर राहुल गांधी यांनी एक खास ट्विट केले आहे. "इरफान खान हे एक अष्टपैलू आणि प्रतिभावान अभिनेते होते. जागतिक चित्रपट आणि टीव्ही रंगमंचावर ते एक भारतीय ब्रँड अ‍ॅम्बेसेडर होते. त्याची नेहमीच आठवण येईल. यावेळी त्यांच्या कुटुंबीय, मित्र व चाहत्यांना हिंमत मिळो" असे राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे. Irrfan Khan Dies: इरफान खान यांना 'या' एका व्यक्तिसाठी जगायची इच्छा होती; शेवटच्या Interview मध्ये सांगितलेल्या गोष्टी वाचा

राहुल गांधी ट्विट

इरफान खान यांना अभिनयातील उत्कृष्ट कामगिरीसाठी पद्मश्री, राष्ट्रीय पुरस्काराने सुद्धा गौरवण्यात आले होते. बॉलिवूड ते हॉलिवूड अनेक स्तरांवर त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली होती, आज त्यांच्या निधनाने सर्वांवरच शोककळा पसरली आहे.