Urvashi Rautela, Gautam Gulati (PC - Instagram)

Urvashi Rautela Marriage: सध्या सोशल मीडियावर बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) आणि 'बिग बॉस 8' विजेता गौतम गुलाटी (Gautam Gulati) चा एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्ही थक्क व्हाल. कारण यात उर्वशी रोतेला गौतम गुलाटीसोबत सप्तपदीचं वचन घेताना पाहायला मिळत आहे.

हा फोटो गौतम गुलाटीने स्वत: आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा फोटो पाहून उर्वशीच्या चाहत्यांना तिने खरचं गौतम गुलाटीसोबत लग्न केलं आहे का? असा प्रश्न पडला आहे. चला तर मग सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या फोटोमागील सत्य जाणून घेऊयात...दरम्यान, या फोटोत उर्वशी लग्नाच्या जोड्यात गौतमसोबत सप्तपदी चालताना दिसत आहे. हा फोटो शेअर करताना गौतमने चाहत्याने 'तुम्ही आम्हाला शुभेच्छा देणार नाही का?' असा प्रश्न विचारला आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. (हेही वाचा - Akshay Kumar Controversy: अभिनेता अक्षय कुमार याचा नाशिक दौरा वादाच्या भोवऱ्यात; पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून चौकशीचे आदेश)

मात्र, गौतम आणि उर्वशीने लग्न केलेलं नाही. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा फोटो गौतमच्या आगामी वेब सीरिजमधील आहे. ‘वर्जिन भानुप्रिया’ असं या वेब सीरिजचं नाव आहे. या वेब सिरिजमध्ये उर्वशी आणि गौतम मुख्य भूमिका साकारणार आहेत. ही वेब सिरिज ZEE5 वर 16 जुलै पासून प्रदर्शित होणार आहे.