Akshay Kumar Controversy: अभिनेता अक्षय कुमार याचा नाशिक दौरा वादाच्या भोवऱ्यात; पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून चौकशीचे आदेश
Akshay Kumar | (Photo Credits: Twitter)

Akshay Kumar Nashik Tour: अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याचा नुकताच उघडकीस आलेला नाशिक (Nashik) दौरा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अक्षय कुमार याने नुकताच नाशिक दौरा केला. या दौऱ्यासाठी त्याने हेलिकॉप्टर वापरले. विशेष म्हणजे या दौऱ्याची नाशिक जिल्हा पालिकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि जिल्हा प्रशासनासही खबर नसल्याचे पुढे येत आहे. कोरोना व्हायरस (Coronavirus) आणि लॉकडाऊ (Lockdown) आदींमुळे राज्यातील वाहतूक व्यवस्था प्रामुख्याने, बस, रेल्वे आणि हवाई वाहतूक बंद असताना अक्षय कुमार याला नाशिक दौऱ्यासाठी हेलिकॉप्टर आणि हेलिपडची परवानगी दिलीच कोणी असा सवाल उपस्थित होत आहे. या पर्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अक्षय कुमार याने नाशिक दौऱ्यात तीन दिवस मुक्काम केला. या काळात तो त्र्यंबक येथील एका रिसोर्टमध्ये मुक्कामी होता. सपकाळ नॉलेज हबच्या हेलिपॅडवर त्याचे आगमन झाले. त्याची विविध छायाचित्र सौशल मीडियावर व्हायरस झाल्यानंतर हा प्रकार समोर आला. मार्शल आर्ट अकॅडमी अथवा निसर्गोपचार केंद्र सुरू करण्याबाबत अक्षयने नाशिक दौरा केल्याची प्राथमिक माहिती आहे. विशेष म्हणजे नाशिक पोलीसही त्यांच्या दिमतीला असल्याचे या दौऱ्याच्या कथीत व्हिडिओमध्ये दिसते आहे. लेटेस्टली मराठी हा व्हिडिओ आणि या दौऱ्याची व्हायरल छायाचित्रे याची पुष्टी करत नाही. (हेही वाचा, 'आता तू गाड्या वापरणं बंद केलंस की ट्विटर?' अक्षय कुमार याने इंधन दरवाढीवरुन 9 वर्षांपूर्वी केलेल्या ट्विटवर जितेंद्र आव्हाड यांचा सवाल)

दरम्यान, कोरना व्हायरस, लॉकडाऊन काळात राज्यात जिल्ह्या सीमाबंदी आहे. हॉटेल्स आणि रिसॉर्टही बंद आहेत. या काळात मुख्यमंत्री, मंत्री आणि लोकप्रतिनिधीही चारचाकीने प्रवास करत आहेत. असे असताना अक्षय कुमार याच्या हेलिकॉप्टर प्रवासाला परवानगीच कशी मिळाली याबाबत कुतुहल व्यक्त करण्यात येत आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.