Guneet Monga (PC - You Tube)

Guneet Monga: RRR चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याला ऑस्कर पुरस्कार (Oscars Award 2023) मिळाल्यापासून या पुरस्काराची सर्वत्र चर्चा होत आहे. याच अवॉर्ड फंक्शनमध्ये डॉक्युमेंट्री फिल्म डायरेक्टर गुनीत मोंगा (Guneet Monga) यांनाही ऑस्कर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. मात्र आता त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पुरस्कार मिळाल्यानंतर गुनीत मोंगा या भाषण द्यायला लागल्या. मात्र, त्यांना पुरेसा वेळ न देताचं मागे गाण्याचे बोल लावण्यात आले आणि इतर पुरस्कार विजेत्यांना बोलण्याची संधी देण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आह.

ऑस्कर पुरस्कार 12 मार्च 2023 रोजी लॉस एंजेलिस, यूएसए मधील डॉल्बी थिएटरमध्ये झाला. यावेळी गुनीत मोंगा यांच्या द एलिफंट व्हिस्परर या लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी कार्तिकी गोन्साल्विसला बोलण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, गुनीत मोंगा यांचे भाषण मधेच थांबवण्यात आले. (हेही वाचा -Oscar Award 2023: ऑस्कर पुरस्काराची ट्राफी सोन्याची असते का? काय आहे या पुस्काराचे स्वरूप? जाणून घ्या

या घटनेचा व्हिडिओ एका ट्विटर यूजरने शेअर केला आहे. द एलिफंट व्हिस्परर हा सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. कार्तिकी गोन्साल्विस आणि गुनीत मोंगा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर पोहोचले. कार्तिकीने 43 सेकंदात आपले भाषण संपवले. पण गुनीत बोलणार इतक्यात संगीत सुरू झाले आणि तिला भाषण देण्यापासून थांबवण्यात आले. हा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल होत आहे.

विशेष म्हणजे ऑस्कर सोहळ्यात 45 सेकंदांच्या एक्सेप्टेंस भाषणाचा नियम बनवण्यात आला आहे, परंतु जेव्हा हे दुसर्‍या प्रकरणात घडले तेव्हा त्यांचे भाषण 45 सेकंदांपेक्षा जास्त असतानाही ते कापले गेले नाही. यामुळे अनेकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिले, 'मलाही ते लक्षात आले. हे बघून माझे मन अस्वस्थ झाले. हे पाहून मला खूप राग आला.'