Oscar Award Trophy (PC - Wikimedia commons)

Oscar Award 2023: आज भारतातील कलाकारांची कीर्ती जगभर झळकली आहे. ऑस्करमध्ये दोन पुरस्कार जिंकून भारताने भारतीयांना जागतिक स्तरावर अभिमान बाळगण्याची संधी दिली आहे. आज एसएस राजामौली यांच्या 'आरआरआर' चित्रपटातील 'नाटू-नाटू' या गाण्याने सर्वोत्कृष्ट गाण्याच्या श्रेणीसाठी ऑस्कर पुरस्कार 2023 जिंकला. तर दुसरीकडे भारतातील शॉर्ट डॉक्युमेंट्री फिल्म 'द एलिफंट व्हिस्पर्स'नेही बाजी मारली.

हा पुरस्कार जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार आहे. कलाविश्वात ऑस्कर हा सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. या पुरस्काराची ट्राफी सोन्यासारखी दिसते. मात्र, ती सोन्याचा नसून तो तांब्याचा आहे आणि त्यावर 24 कॅरेट सोन्याचा थर लावला जातो. त्याचे वजन 450 ग्रॅम आहे आणि ऑस्कर पुरस्कार फक्त 1 डॉलरचा असतो. जर ही ट्रॉफी विकली गेली तर फक्त एक डॉलर म्हणजे 81.89 म्हणजेच सुमारे 82 रुपये मिळू शकतात. परंतु, हा पुरस्कार विकला किंवा विकत घेतला जाऊ शकत नाही. (हेही वाचा - Oscars 2023: ऑस्कर सोहळ्यात 'नाटू-नाटू' गाण्यावर अमेरिकन डान्सर्सनी केला धमाकेदार डान्स, पहा व्हिडिओ)

या पुरस्काराला ऑस्कर म्हटले जाण्यामागेही एक रंजक गोष्ट आहे, ती म्हणजे या अकादमीच्या कार्यकारी संचालिका मार्गारेटने जेव्हा ही ट्रॉफी पाहिली तेव्हा त्यांना ही ही ट्रॉफी आपल्या अंकल ऑस्कर सारखी वाटली. ज्यांच्यावर त्यांचे खूप प्रेम होते. म्हणून त्यांनी त्याचे नाव ऑस्कर ठेवले.

हार्मन ऑस्कर नेल्सन

तथापि, विकिपीडियानुसार, बेट्टी डेव्हिसच्या चरित्रात असे म्हटले आहे की तिने या पुरस्काराचे नाव तिचे पहिले पती हार्मन ऑस्कर नेल्सन यांच्या नावावर ठेवले आहे. हा पुरस्कार अमेरिकेच्या अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसद्वारे दिले जातात. ज्याला अकादमी पुरस्कार म्हणूनही ओळखले जाते. हा पुरस्कार चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते, लेखक, गायक आणि संगीतकार यांना दिले जातात.

पहिला ऑस्कर पुरस्कार सोहळा 16 मे 1929 रोजी देण्यात आला. मीडिया जगतातील हा सर्वात जुना पुरस्कार आहे, ज्याला मीडिया जगत 'गोल्डन लेडी' म्हणून संबोधतात. विशेष म्हणजे या ट्रॉफीशिवाय ऑस्कर विजेत्यांना कोणतीही रोख रक्कम दिली जात नाही. होय, परंतु ही प्रतिष्ठित ट्रॉफी मिळाल्यानंतर, जागतिक स्तरावर त्या विजेत्याची किंमत वाढते. मात्र, पुरस्कारासोबतच कलाकारांना एक 'गुडी बॅग'ही दिली जाते. ज्यात हजारो वस्तूंचा समावेश असतो. हा पुरस्कार कलाकारांना जागतिक दर्जाची ओळख देतो.