Dil Bechara: सुशांत सिंह राजपूत याच्या अखेरच्या गाण्यासाठी फराह खान हिने केली होती कोरियाग्राफी, अभिनेत्याच्या आठवणीत लिहिली भावुक पोस्ट
सुशांत सिंह राजपूत आणि फराह खान (Photo Credits-Instagram)

सुशांत सिंह राजपूत याचा अखेरचा चित्रपट 'दिल बेचारा'  (Dil Bechara) च्या ट्रेलर प्रेक्षकांच्या चांगलाच पसंदीस पडला आहे. हा ट्रेलर जगभरातील दिग्गज चित्रपटांना मागे टाकत पाहिला गेला आहे. त्यानंतर आता दिल बेचारा चित्रपटाचे टायटल ट्रॅक रिलिज करण्याची तयारी करण्यात येत आहे. यामधून सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) झळकणार असून टाटल ट्रॅकच्या गाण्याची कोरियाग्राफी फराह खान हिले केली आहे. फराह खान (Farah Khan) हिच्यासाठी सुशांतचे हे गाणे अधिकच खास असून त्याचे हे शेवटचे गाणे असल्याचे तिने म्हटले आहे.

दिल बेचाराच्या टायटल ट्रॅक बाबत दिग्दर्शक मुकेश छाबडा यांनी असे म्हटले आहे की, याचे टायटल ट्रॅक त्यांच्या हृदयाच्या खुप जवळ आहे. हे गाणे फराह हिने कोरियाग्राफ केले आहे. तसेच या गाण्याची खासियत म्हणजे सुशांत याने ते एकाच शॉटमध्ये याचे शुटिंग पूर्ण केले होते. ऐवढेच नव्हे तर सुशांतच्या या मेहनतीसाठी फराह खान याने त्याला घरी जेवणासाठी सुद्धा बोलावले होते. सुशांतबाबत फराह खान अत्यंत खुश होती.(सुशांत सिंह राजपूत च्या शेवटच्या 'Dil Bechara' चित्रपटाच्या ट्रेलरने बनवला नवा रेकॉर्ड; हॉलिवूडच्या एवेंजर्स: इन्फिनिटी वॉरला सुद्धा टाकले मागे)

मुकेश छाबडा यांनी पुढे असे ही म्हटले आहे की, फराह सोबत मिळून सुशांत याने दिवसभर रिहर्सल केली. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी या गाण्याचे शुटिंग पूर्ण करण्यात आले. या गाण्यासाठी सुशांत याने कठोर मेहनत आणि प्रभावशाली अशा डान्समुळे फरहा खान हिचे मन जिंकले होते. फराह खान हिने या गाण्यासाठी पैसे सुद्धा घेतले नाहीत.(Dil Bechara Official Trailer: सुशांत सिंह राजपूत याचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा' चा ट्रेलर अखेर प्रदर्शित; हृदयाला स्पर्शून जाणारा हा ट्रेलर एकदा पाहाच)

फराह हिने या गाण्याबाबत आपला अनुभव सांगत असे म्हटले आहे की, सुशांत आणि माझ्यातील मैत्री खुप काळापासून होती. मात्र कधीच एकत्रित काम करण्याची संधी मिळालेली नाही. तसेच सुशांत याच्या नृत्य कौशल्याबाबत मला विश्वास होता. एकाच शॉट मध्ये संपूर्ण गाणे प्रदर्शित व्हावे असे वाटत होते. त्यानुसार सुशांत याने आपल्या मेहनतीने हे गाणे एकाच दिवसात शूट केले. या शूट नंतर सुशांत याला माझ्या घरी जेवायला यायचे होते आणि तो आला सु्द्धा होता. हे गाणे नेहमीच माझ्यासाठी खास असणार असल्याचे ही फराह खान हिने म्हटले आहे.