सुशांत सिंह राजपूत च्या शेवटच्या 'Dil Bechara' चित्रपटाच्या ट्रेलरने बनवला नवा रेकॉर्ड; हॉलिवूडच्या एवेंजर्स: इन्फिनिटी वॉरला सुद्धा टाकले मागे
Dil Bechara Trailer Record (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडचा हरपलेला हरहुन्नरी अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा' (Dil Bechara) चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. सुशांतच्या आत्महत्येने त्याच्या चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला. त्याच्या आठवणींच्या रुपात त्यांच्या समोर येणारा 'दिल बेचारा' हा चित्रपट त्याच्या चाहत्यांसाठी खूप खास असणार आहे. त्यामुळे या चित्रपटाचा ट्रेलर 6 जुलै ला संध्याकाळी 4 वाजता प्रदर्शित झाला. त्यानंतर काही मिनिटांतच या ट्रेलरने विश्व विक्रम केला. या ट्रेलरला आतापर्यंत 3.7 मिलियन लाइक्स मिळाले आहेत. याआधी इतका रेकॉर्ड हॉलिवूडच्या एवेंजर्स: इन्फिनिटी वॉर (Avengers: Infinity War) च्या ट्रेलरने केला होता. ज्याला 3.6 मिलियन लाइक्स मिळाले होते.

सुशांतचा हा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा' हा मोठ्या पडद्यावर म्हणजेच सिनेमागृहात प्रदर्शित व्हावा अशी मागणी त्याच्या चाहत्यांकडून वारंवार होत होती. मात्र या चित्रपटाच्या निर्मात्यांनी हा चित्रपट OTT वर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 24 जुलै ला हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होईल. Dil Bechara Official Trailer: सुशांत सिंह राजपूत याचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा' चा ट्रेलर अखेर प्रदर्शित; हृदयाला स्पर्शून जाणारा हा ट्रेलर एकदा पाहाच

या चित्रपटात सुशांत सोबत संजना संघी प्रमुख भूमिकेत दिसेल. दिल बेचारा प्रदर्शित होताच सुशांतच्या चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले. त्यामुळे केवळ 8 तासांत या ट्रेलरला 4 मिलियनहून अधिक लाईक्स मिळाले.

Dil Bechara Trailer: Sushant Singh Rajput चा Dil Bechara सिनेमाचा ट्रेलर Youtube वर सर्वाधिक पाहिला गेला - Watch Video

आतापर्यंत या ट्रेलरला 2 कोटीहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. मुकेश छाब्रा दिग्दर्शित या चित्रपटाला ए.आर.रेहमान यांनी संगीत दिले आहे. तसेच फॉक्स स्टार स्टुडिओ या चित्रपटाचे निर्माते आहेत. सुशांतची अभिनयाची शेवटची झलक दाखवणारा 'दिल बेचारा' चित्रपटाचा ट्रेलर चाहत्यांची मनं जिंकत आहे असे म्हणायला हरकत नाही.