Dil Bechara Official Trailer: सुशांत सिंह राजपूत याचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा' चा ट्रेलर अखेर प्रदर्शित; हृदयाला स्पर्शून जाणारा हा ट्रेलर एकदा पाहाच
Dil Bechara Trailer (Photo Credits: YouTube)

बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput)  याच्या आत्महत्येने त्याच्या चाहत्यांना प्रचंड धक्का बसला. आता यापुढे आपल्याला सुशांतला पाहता येणार नाही हे दु:ख त्यांना पचवता येत नाहीय. मात्र त्याने काम केलेला त्याचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा' हा त्यांच्यासाठी सुशांतची खास आठवण असणार आहे. सर्वांना उत्सुकता लागून राहिलेल्या 'दिल बेचारा' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सुशांत सिंह राजपूत आणि संजना संघी (Sanjana Sanghi) हे दोघे या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. कर्करोगाने ग्रस्त असलेल्या आपल्या गर्लफ्रेंडला आयुष्य कसे जगायचे हे सांगणारी एक सुंदर कथा या ट्रेलरमधून सांगण्यात आली आहे.

मुकेश छाब्रा (Mukesh Chhabra) दिग्दर्शित या चित्रपटाला ए.आर.रेहमान (A.R.Rahman) यांनी संगीत दिले आहे. तसेच फॉक्स स्टार स्टुडिओ या चित्रपटाचे निर्माते आहेत. सुशांतची अभिनयाची शेवटची झलक दाखवणारा 'दिल बेचारा' चित्रपटाचा ट्रेलर येथे पाहा

पाहा ट्रेलर:

हेदेखील वाचा- सुशांत सिंह राजपूत याची 'दिल बेचारा' सिनेमातील को-स्टार संजना संघी हिने सोडली मुंबई; पहा पोस्ट

सुशांतची शेवटची आठवण म्हणून त्याचा दिल बेचारा हा चित्रपट मोठ्या पडद्यावरच प्रदर्शित व्हावा अशी मागणी चाहते करत होते. मात्र, चाहत्यांची ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही आणि अखेर दिल बेचारा हा चित्रपट निर्मात्यांनी हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. 'दिल बेचारा' हा चित्रपट येत्या 24 जुलैला ऑनलाईन प्रदर्शित होईल अशी माहिती हॉटस्टारच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन देण्यात आली आहे. मात्र, निर्मात्यांच्या या निर्णयावर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सुशांतचा शेवटचा चित्रपट सिनेमागृहातच प्रदर्शित व्हावा, अशी मागणी चाहते सोशल मीडियाव्दारे करत आहेत.