
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याची अकाली एक्झिट मनाला चटका लावणारी होती. खास करुन सुशांतच्या जवळच्या लोकांसाठी हा मोठा धक्का होता. यामुळे सुशांत सिंह राजपूत याच्या 'दिल बेचारा' (Dil Bechara) सिनेमात त्याच्यासह प्रमुख भूमिकेत असणारी संजना संघी (Sanjana Sanghi) प्रचंड व्यथित झाली आहे. संजना हिने काल (1 जुलै) मुंबईला रामराम ठोकला. याची माहिती तिने सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे. "दिल्लीला जात आहे. कदाचित परत न येण्यासाठीच." संजनाची ही पोस्ट पाहता पहिल्या सिनेमानंतर संजना संघी बॉलिवूड सोडत असल्याचा अंदाज चाहते लावत आहेत. (Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर करण जोहरची लोकप्रियता झाली कमी; सोशल मीडियावर 5 लाख युजर्संनी केलं अनफॉलो)
संजनाने काल इंस्टा स्टोरीत मास्क घातलेला स्वतःचा फोटो शेअर केला होता. त्यात तिने लिहिले होते, "खुदा हाफिज मुंबई. 4 महिन्यानंतर तुमचे दर्शन झाले. मी दिल्लीला जात आहे. तुमचे रस्ते काहीसे वेगळे वाटले, सुमसाम वाटले, कदाचित माझ्या मनातील दुःख माझा दृष्टीकोन बदलत आहे. किंवा कदाचित तुम्हीपण सध्या काहीशा दुःखात आहात. भेटू? लवकरच. किंवा कदाचित, नाहीच."
पहा पोस्ट:

काही दिवसांपूर्वीच संजनाने मुंबईतील वांद्रे पोलिस स्थानकात सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी आपला जबाब नोंदवला. आता संजनाची ही सोशल मीडिया पोस्ट पाहिल्यानंतर संजना संघी हिला पुन्हा सिनेमात पाहायला मिळणार नाही असा अंदाज चाहत्यांकडून लावण्यात येत आहे.