Rashmika Mandanna Deepfake Video: रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) सध्या तिच्या आगामी 'अॅनिमल' चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याच वेळी, अभिनेत्री गेल्या काही दिवसांपासून एका वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आली. रश्मिका मंदान्नाचा एक डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, जो पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. हा व्हिडिओ पाहून रश्मिकाही थक्क झाली आणि तिने एक निवेदन जारी करून आपली तक्रार शेअर केली.
दिल्ली पोलिसांनी गुरुवारी सांगितले की, त्यांना अभिनेत्री रश्मिका मंदान्नाच्या डीपफेक व्हिडिओंशी संबंधित प्रकरणाच्या तपासात महत्त्वपूर्ण लीड्स सापडल्या आहेत. तांत्रिक विश्लेषणाद्वारे त्यांची पडताळणी केली जात आहे. तांत्रिक विश्लेषणाचा एक भाग म्हणून, अधिकारी सर्व आयपी पत्ते ओळखत आहेत, जिथून व्हिडिओ अपलोड केला गेला. हा व्हिडिओ कुठे अपलोड केला गेला याचा पत्ता शोधण्याचा प्रयत्न करत आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. (हेही वाचा - Kajol's Deepfake Video Viral: रश्मिका मंदान्ना, कतरिना कैफनंतर काजोलचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल)
हा व्हिडिओ प्रथम इंटरनेटवर अपलोड करण्यात आला होता. पोलिस उपायुक्त (IFSO, स्पेशल सेल) हेमंत तिवारी यांनी सांगितले की, त्यांच्याकडे महत्त्वाचे संकेत मिळाले असून आरोपींना लवकरच अटक केली जाईल. 11 नोव्हेंबर रोजी, दिल्ली पोलिसांच्या इंटेलिजेंस फ्यूजन अँड स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स (IFSO) ने या प्रकरणाच्या संबंधात अज्ञात लोकांविरुद्ध एफआयआर नोंदवला होता.
आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भात बोलताना सांगितलं की, सरकार लवकरच डीपफेकशी निगडीत नवीन नियम आणणार आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात जाणार आहेत.