Alok Nath And Shreyas Talpade (फोटो सौजन्य - wikipedia.org)

FIR Against Alok Nath And Shreyas Talpade: उत्तर प्रदेशातील लखनऊ ( Lucknow) मधील गोमती नगर पोलिस स्टेशनमध्ये (Gomti Nagar Police Station) बॉलीवूड अभिनेता आलोक नाथ (Alok Nath), श्रेयस तलपदे (Shreyas Talpade) आणि क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या (Credit Cooperative Society) पाच सदस्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की, 7 आरोपींनी 45 गुंतवणूकदारांना 9.12 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. तत्पूर्वी दोन्ही बॉलीवूड अभिनेते आणि इतर 11 जणांवर हरियाणाच्या सोनीपतमध्येही याच मल्टी-लेव्हल मार्केटिंग घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा खटला एका सहकारी संस्थेशी संबंधित आहे, जी लाखो लोकांकडून कोट्यवधी रुपये वसूल केल्यानंतर अचानक गायब झाली. ही सोसायटी गेल्या सहा वर्षांपासून लोकांकडून पैसे ठेव म्हणून स्विकारत होती. परंतु जेव्हा लोकांनी त्यांचे पैसे परत मागितले तेव्हा त्याचे संचालक फरार झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या दोन्ही अभिनेत्यांनी या सोसायटीच्या गुंतवणूक योजनांचा प्रचार केला होता, तर दुसरा अभिनेता सोनू सूद देखील त्यांच्या एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिला होता. (हेही वाचा - Shreyas Talpade and Alok Nath booked: बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदे आणि आलोक नाथ यांच्यावर गुन्हा दाखल, कारण घ्या जाणून)

काय आहे नेमकं प्रकरण?

एफआयआरनुसार, 'ह्युमन वेल्फेअर क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी' नावाच्या या संस्थेने 16 सप्टेंबर 2016 रोजी हरियाणा आणि लखनऊसह अनेक राज्यांमध्ये आपला व्यवसाय सुरू केला. ही सोसायटी मध्य प्रदेशातील इंदूर येथे नोंदणीकृत होती आणि बहु-राज्य सहकारी सोसायटी कायद्यांतर्गत काम करत होती. सोसायटीने गुंतवणूकदारांना फिक्स्ड डिपॉझिट (एफडी) आणि रिकरिंग डिपॉझिट (आरडी) योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची ऑफर दिली आणि त्यांना आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवले. (हेही वाचा, Actor Shreyas Talpade Reacts to His Death Hoax: 'मी जिवंत आहे'; निधनाच्या खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना श्रेयस तळपदे ने सुनावलं)

सोसायटीच्या 250 हून अधिक शाखा -

एवढचं नाही तर सोसायटीने मल्टी-लेव्हल मार्केटिंग (एमएलएम) चे मॉडेल स्वीकारले आणि मोठ्या प्रोत्साहनांचे आश्वासन देऊन लोकांकडून पैसे गोळा केले. हळूहळू, सोसायटीने स्वतःला एक विश्वासार्ह वित्तीय संस्था म्हणून स्थापित केले आणि गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे सुरक्षित राहतील असे आश्वासन दिले. सोसायटीशी संबंधित एजंट विपुलने माहिती दिली की, त्याने 1 हजारहून अधिक खाती उघडली आहेत, परंतु यापैकी कोणत्याही खातेधारकाला आतापर्यंत त्यांचे पैसे मिळालेले नाहीत. या सोसायटीच्या राज्यभरात 250 हून अधिक शाखा होत्या आणि सुमारे 50 लाख लोक त्याच्याशी जोडले गेले होते.

लोकांना गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन -

दरम्यान, एजंट्सद्वारे घरोघरी जाऊन लोकांना गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित केले जात होते. या कामासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा देखील वापर करण्यात आला. याशिवाय, सोसायटीने हॉटेल्समध्ये मोठे कार्यक्रम आयोजित केले, ज्यामध्ये गुंतवणूकदार आणि एजंटना त्यांचे पैसे पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री देण्यात आली.