Shreyas Talpade and Alok Nath | | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि आलोक नाथ (Alok Nath) यांच्यावर हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील मुरथल पोलीस (Murthal Police) स्टेशनमध्ये फसवणूकीचा गुन्हा (FIR Haryana) दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी 22 जानेवारी रोजी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये आरोपींसह इतर 11 जणांचाही समावेश आहे, ज्यामुळे एकूण आरोपींची संख्या 13 झाली आहे. भारतीय न्याय संहिता (Bharatiya Nyaya Sanhita) कलम 316 (2) 318 (2) आणि 318 (4) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. जो विश्वासघात, फसवणूक आणि फसव्या पद्धतींद्वारे मालमत्ता हस्तांतरणाच्या आरोपांशी संबंधित आहे.

गुंतवणुकीचे आमिष दाखवून फसवणूक

अतिरिक्त पोलीस आयुक्त (ए. सी. पी.) अजित सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण प्रामुख्याने लोकांना गुंतवणुकीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या संस्थेला लक्ष्य करते. तक्रारदाराच्या जबाबात श्रेयस तळपदे आणि आलोकनाथ यांची नावे आहेत. मात्र, त्यांचा नेमका सहभाग निश्चित करण्यासाठी पुढील तपास आवश्यक आहे. आम्ही तपास करत आहोत. तपासामध्ये अधिक तपशील पुढे येऊ शकेल, असे सिंग म्हणाले. (हेही वाचा, Actor Shreyas Talpade Reacts to His Death Hoax: 'मी जिवंत आहे'; निधनाच्या खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना श्रेयस तळपदे ने सुनावलं)

कथीत संस्था आरोपीच्या पिंजऱ्यात

कथीत संस्थेने अधिक लाभाचे आमिश दाखवून गुंतवणूकदारांची दिशाभूल केली, ज्यामुळे त्यांना लक्षणीय आर्थिक नुकसान झाले, असा या प्रकरणातील प्रमुक आरोप आहे. तक्रारदाराने म्हटले आहे की, तळपदे आणि नाथ यांच्यासह अनेक व्यक्तींना त्यांना आर्थिक लाभाचे आमीश दाखवून फसवले आहे. (हेही वाचा: Shreyas Talpade : "आरोग्याची एवढी काळजी घेऊन ही...", हृदयविकाराचा झटका आणि कोरोना लसीबद्दल श्रेयस तळपदेकडून अनेक शंका उपस्थित)

बॉलीवूड कायदेशीर संकटात

या कायदेशीर घडामोडींमुळे बॉलीवूड पुन्हा एकदा कायदेशीर प्रकाशझोतात आले आहे, कारण अशा प्रकारच्या प्रकरणात प्रमुख कलाकारांचा सहभाग मनोरंजन उद्योगातील विश्वास आणि नैतिकतेबद्दल चिंता निर्माण करतो. अलिकडेच पुढे आलेला महादेव बेटींग अॅप प्रकणात अनेक बॉलीवूड आणि टॉलिवूडमधील कलाकारांचा समावेश असल्याचे पुढे आले. त्यातील काहींवर गुन्हेही दाखल झाले आहेत. या प्रकरणात राजकीय मंडळींनीही उडी घेतल्याने संबंधित राज्यांच्या विधानसभा निवडणुकांध्येही हा मुद्दा जोरदार गाजला. (हेही वाचा: Shreyas Talpade Gets Heart Attack: लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका; झाली अँजिओप्लास्टी- Reports)

दरम्यान, तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीत अभिनेत्यांची नावे घेतली असली तरी, या प्रकरणात त्यांचा किती सहभाग आहे याबाबत अद्याप कणतीही माहिती पुढे आली नाही. अनेकदा प्रसिद्धी आणि प्रकरणांमध्ये हायप्रोफाईल चौकशी व्हावी, प्रकरणामध्ये सखोलता वाढावी या कारणांतूनही आरोप होतात. त्यामुळे पोलीस आरोपांच्या मुळाशी जाऊन चौकसी करत आहेत. अधिक तपशिलाची प्रतिक्षा आहे.

श्रेयस तळपदे आणि अलोकनाथ हे दोघेही भारतातील नामवंत अभिनेते आहेत. तळपदे हा विविध चित्रपटांमध्ये केलेला अभिन आणि चित्रपट निर्मिती, भाषिक अभिनय आणि मनोरंजन क्षेत्रातील विविध घडामोडी, विभागांशी संबंधीत कामांमुळे चर्चेत असतो. तो मराठी चित्रपटसृष्टीतही काम करतो. तर अलोकनाथ हे देखील विविध टीव्ही मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांना परिचीत आहेत. दोघांचाही स्वत:चा चाहता वर्ग आहे.