चित्रपटसृष्टीमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. 47 वर्षीय प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे याला गुरुवारी संध्याकाळी शूटिंग संपल्यानंतर अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर अभिनेत्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. शहरातील अंधेरी पश्चिम येथील बेलेव्ह्यू हॉस्पिटलमध्ये अभिनेत्याची अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. अनेक मराठी-हिंदी चित्रपटांमध्ये काम केलेला अभिनेता लवकर बरा व्हावा यासाठी सोशल मीडियावर चाहते प्रार्थना करत आहेत. हिंदुस्थान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे.

अहवालानुसार, श्रेयस तळपदे पूर्णपणे बरा होता आणि तो सध्या वेलकम टू द जंगल या मल्टीस्टारर चित्रपटासाठी संपूर्ण दिवस शूटिंग करत होता. त्याने दिवसभर चित्रीकरण केले यावेळी तो पूर्णपणे ठीक होता. त्याने थोडेसे अॅक्शन असलेले सीन्सही शूट केले. शूटिंग संपल्यानंतर तो घरी परतला आणि त्याने पत्नीला सांगितले की त्याला थोडे अस्वस्थ वाटत आहे. त्यानंतर पत्नीने त्याला दवाखान्यात नेले मात्र तो वाटेतच कोसळला. त्यानंतर त्याची अँजिओप्लास्टी करण्यात आली. (हेही वाचा: Ravindra Berde Passed Away: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचं निधन, वयाच्या 78 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)