Ravindra Berde Passed Away: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचं निधन, वयाच्या 78 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मराठी सिनेमांमध्ये आपल्या उत्कृष्ट विनोदी अभिनयासाठी ओळखले जाणारे अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन झाले आहे. रवींद्र बेर्डे यांनी मराठी सोबतच हिंदीमध्ये देखील काम केले होते. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील बऱ्याच वर्षांपासून ते घशाच्या कर्करोगाने ते त्रस्त होते. काही महिन्यांपासून टाटा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. दोन दिवसांपूर्वीच रवींद्र बेर्डे यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आले होते. अचानक त्यांना हृदय विकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन (Ravindra Berde Passed Away) झाले. (हेही वाचा - Kannada Actress Leelavathi Dies: ज्येष्ठ कन्नड अभिनेत्री लीलावती काळाच्या पडद्याआड; 85 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)

रवींद्र बेर्डे यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसुष्टीवर शोककळा पसरली आहे. रवींद्र बेर्डे हे दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांचे मोठे भाऊ होते. चंगू मंगू, एक गाडी बाकी अनाडी, हाच सुनबाईचा भाऊ, खतरनाक,हमाल दे धमाल, थरथराट, उचला रे उचला, यांसारख्या 300 हून अधिक मराठी चित्रपटात त्यांनी काम केले होते. तसेच पाच हिंदी चित्रपटात देखील त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता.

रोहीत शेट्टीच्या सिंघम या सिनेमातही रवींद्र बेर्डे हे होते. मात्र तब्येतीच्या कारणामुळे

रवींद्र बेर्डे गेल्या काही दिवसांपासून मनोरंजनसृष्टीपासून दूर होते. त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. चाहतेही सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त करत आहेत.