श्रेयस तळपदेला मागील महिन्यात अचानक कार्डिएक अरेस्ट चा झटका आला. 'काळ आला होता पण वेळ आली नव्हती' याची अनुभती त्याने या हृदयविकाराच्या झटक्यादरम्यान घेतली आहे. 47 वर्षीय श्रेयस पहिल्यांदा या झटक्यामुळे हॉस्पिटल मध्ये गेला. त्याने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये ' मी 'क्लिनिकली डेड' होतो, ऑपरेशननंतर मला मिळालेला हा दुसरा जन्म' असल्याची भावना त्याने बोलून दाखवली आहे. हेल्दी लाईफ, डाएट सांभाळूनही हा जीवघेणा अनुभव आला. त्यामुळे तुमचं आयुष्य गृहित धरू नका असं तो म्हणाला आहे. श्रेयसचं हृद्य तो हॉस्पिटल मध्ये पोहचला तेव्हा 10 मिनिटं बंद होतं. नंतर सीपीआर आणि शॉक देऊन पुन्हा जीवित केल्याचंही सांगतो.

पहा पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Renuka Vyavahare (@mumbaigirl14)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)