शिवसेना (UBT) पक्षप्रमुख Uddhav Thackeray रिलायन्स रुग्णालयात अँजिओप्लास्टी झाल्यानंतर मातोश्रीवर परतले, पहा व्हिडिओ (Watch)

उद्धव ठाकरे मंगळवारी, अँजिओप्लास्टी झाल्यानंतर मुंबईतील त्यांच्या 'मातोश्री' निवासस्थानी परतले आहेत. ठाकरे यांच्यावर सर एचएन रिलायन्स रुग्णालयात अँजिओप्लास्टी झाली होती.

शिवसेना (UBT) पक्षप्रमुख Uddhav Thackeray रिलायन्स रुग्णालयात अँजिओप्लास्टी झाल्यानंतर मातोश्रीवर परतले, पहा व्हिडिओ (Watch)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे । Photo Credits: PTI

Uddhav Thackeray Returns To Matoshree After Angioplasty: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मंगळवारी, अँजिओप्लास्टी झाल्यानंतर मुंबईतील त्यांच्या 'मातोश्री' निवासस्थानी परतले आहेत. ठाकरे यांच्यावर सर एचएन रिलायन्स रुग्णालयात अँजिओप्लास्टी झाली होती. वृत्तानुसार, ठाकरे यांना सोमवारी हृदय तपासणीसाठी एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ठाकरेंच्या तब्येतीबद्दल अपडेट देताना, आदित्य ठाकरे यांनी X वर एका पोस्टमध्ये सांगितले होते की, ही तपासणी पूर्वनियोजित होती. त्यांच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमनीमध्ये अडथळे निर्माण झाल्याचे अँजिओग्राफीतून समोर आले होते. त्यानंतर तात्काळ अँजिओप्लास्टी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. आता उद्धव ठाकरे घरी परतले आहेत. ठाकरे यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे वृत्त आहे. (हेही वाचा: Madhukarrao Pichad Hospitalised: मधुकरराव पिचड यांना ब्रेनस्ट्रोक; नाशिक मध्ये उपचार सुरू)

Uddhav Thackeray Returns To Matoshree After Angioplasty:

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).