Sonakshi Sinha (Photo Credit: File Photo)

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) हिच्या सह पाच जणांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद (Moradabad) जिल्ह्यात कटघर परिसरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिल्लीतील कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी सोनाक्षी सिन्हाने तब्बल 37 लाख रुपये घेतले होते. मात्र अखेरच्या क्षणी तिने कार्यक्रमाला येण्याचे टाळले, असा आरोप कार्यक्रमाच्या आयोजकांनी केला आहे. सोनाक्षीच्या या वागणूकीमुळे कार्यक्रमाचे आयोजक प्रसाद शर्मा यांनी सोनाक्षीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी सोनाक्षीसह टॅलेंट फुल ऑन कंपनीचे अभिषेक सिन्हा, मालविका पंजाबी, धूमिल ठक्कर आणि अॅडगर सकारिया यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

30 सप्टेंबर 2018 रोजी 'इंडिया फॅशन अँड ब्युटी अवॉर्ड' कार्यक्रमाचं आयोजन दिल्लीत करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला सोनाक्षी हजर राहणार होती. मात्र पैसे घेऊनही अखेरच्या क्षणी तिने कार्यक्रमाला उपस्थित राहणे टाळले.